• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : यूएसएच्या विजयाचा भारत-पाकिस्तान सामन्यावर थेट असा परिणाम, काय झालं?

February 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील 21 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यूएसए विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. यूएसएने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विजय मिळवला. यूएसएने नेदरलँड्सला 197 धावांचा पाठलाग करताना 25 बॉलआधी गुंडाळलं. यूएसएने नेदरलँड्सला 15.5 ओव्हरमध्ये 103 रन्सवर ऑलआऊट केलं. यूएसएने यासह 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. यूएसएच्या या विजयाचा ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये मोठा परिणाम झाला आहे.

यूएसएने सामना जिंकण्यासह नेदरलँड्सला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखलं. यूएसएने यासह ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये नेदरलँड्सला पछाडत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. तसेच यूएसएच्या विजयामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात सुपर 8 च्या हिशोबाने कसा परिणाम झालाय? हे जाणून घेऊयात.

ताज्या आकडेवारीनुसार यूएसए आणि नेदरलँड्स दोन्ही संघांनी 3 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. तर 2 सामने गमावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ अजिंक्य आहेत. टीम इंडिया नेट रनरेट चांगला असल्याने समसमान 4 गुण असूनही पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आता यूएसने विजय मिळवल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ हा थेट सुपर 8 मध्ये पोहचणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे आधीच हायव्होल्टेज असलेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना आणखी रस्सीखेच पाहायला मिळणार हे निश्चित आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध 8 पैकी सर्वाधिक 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in