• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?

February 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. हा सामना बुलावायोमधील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तानचा कॅप्टन फरहान यूसुफने फिल्डिंगचा निर्णय घेतला. तर भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली. आम्हाला फलंदाजीच पाहिजे असल्याचं आयुषने नमूद केलं. तसेच या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आयुषने दिली.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. उधव मोहन याला या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्याच्या जागी दीपेशन देवेंद्रन याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पाकिस्ताननेही 1 बदल केलाय. पाकिस्तानने अली हसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral
  • Budget 2026: महिलांसाठी आता फ्लिपकार्टसारखं स्वत:चं पोर्टल, SHE-Mart बनणार; कशी होणार कमाई?
  • Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर 5 राउंड फायरिंग… कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी… पोस्ट पाहून भरेल धडकी
  • IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?
  • Nirmala Sitharaman Budget Announcement | भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in