• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा

January 9, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात टोकाला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय भारतीय संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश फक्त मल्टीनॅशनल स्पर्धेतच आमनेसामने येतात. इतकंच काय तर तटस्थ ठिकाणी या दोन्ही संघांचा सामना होतो. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात सामना होणार हे स्पष्टच होतं. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान हे संघ श्रीलंकेत हे दोन्ही संघ भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानकडून वाकयुद्ध सुरू झालं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यापूर्वीच पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बेताल वक्तव्य करत टीम इंडियाला इशारा देत आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर भारत पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेपासून भारतीय संघाने नो हँडशेक पॉलिसी स्वीकारली होती. आताही तसंच असेल यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यापूर्वीही वादाला फोडणी मिळणार यात काही शंका नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी म्हणाला की, “सीमेपलीकडून आलेल्यांनी खेळ भावनेचे उल्लंघन केले आहे. पण आमचे काम क्रिकेट खेळणे आहे आणि आमचे लक्ष त्यावर आहे. आम्ही त्यांना मैदानावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करू.” सध्या तरी भारताने या विषयावर मौन बाळगले आहे.

भारताने आशिया कप स्पर्धेत सलग तीन वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. महिला क्रिकेटपटूंनीही वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला लोळवलं. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंतचा टी20 स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. भारत पाकिस्तान हे संघ 16वेळा आमनेसामने आले. यात पाकिस्तानला फक्त तीन वेळा विजय मिळाला आहे. तर भारताने 12 वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8 वेळा आमनेसामने आले आणि भारताने 7-1 असा विजय मिळला आहे.2022 पासून पाकिस्तानने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. तर भारताने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in