• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार, ट्रॉफी चोर नक्वीची नवी चाल

February 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने खेळणार असल्याचं स्पष्ट आहे.

पाकिस्तानचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे सहयजमान श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तान सरकारने पीसीबीला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिलीय. मात्र त्यानंतरही पाकिस्तान टीम टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. “पाकिस्तान क्रिकेट टम 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही”, अशी माहिती पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात आली आहे. मात्र सामन्यावर बहिष्कारामागील कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in