• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तान विरुद्ध कोण तोडणार विराट कोहलीचा रेकॉर्ड? किती SIX मारावे लागतील?

February 14, 2026 by admin Leave a Comment


T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये युवा फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा खास रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध एका बाबतीत सर्वात पुढे निघून जाऊ शकतात. (PHOTO CREDIT- PTI)

पाकिस्तान विरुद्ध T20I मध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू विराट कोहली आहे. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध 11 टी20 सामन्यात 11 सिक्स मारले आहेत. विराट कोहली आता T20I मधून रिटायर झालाय. अशावेळी तिलक वर्मा, अभिषेक शर्माकडे त्याच्या पुढे जाण्याची संधी आहे. (PHOTO CREDIT- PTI)

तिलकला विराटचा रेकॉर्ड मोडण्यासाठी या मॅचमध्ये पाच सिक्स मारावे लागतील. त्याने असं केल्यास पाकिस्तान विरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू तो बनेल. त्याचवेळी अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याला सुद्धा हा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी पाच सिक्स मारावे लागतील. दोन्ही खेळाडूंच्या नावावर सध्या प्रत्येकी 5-5 सिक्स आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

अभिषेक शर्मा अलीकडेच नामीबिया विरुद्ध मॅच आजारी असल्यामुळे खेळू शकला नव्हता. पाकिस्तान विरुद्ध सामन्याच्या एकदिवस आधी म्हणजे आज त्याची फिटनेस टेस्ट होईल. अभिषेक शर्माचं पाकिस्तान विरुद्ध खेळणं निश्चित नाहीय. पण तिलकला संधी मिळणं जवळपास निश्चित आहे. (PHOTO CREDIT- PTI)

तिलक वर्मा या वर्ल्ड कपमध्ये दोन मॅच खेळलाय. दोन्हीवेळा त्याने 25-25 धावा केल्या आहेत. पण मोठी इनिंग खेळण्यात तो अपयशी ठरलाय. 2025 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यात त्याने नाबाद 69 धावा फटकावल्या होत्या. या मॅचमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. (PHOTO CREDIT- PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in