• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK: कोलंबोच्या मैदानात पुन्हा एकदा साप घुसला, सामन्याआधीच…

February 15, 2026 by admin Leave a Comment

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना आज होत आहे. या सामन्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर हा दिवस उजाडला असून विजयाची चव कोण चाखणार याची प्रतीक्षा आता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. पण असं असताना या सामन्यापूर्वी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सर्पदर्शन झालं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या मैदानात सापाचं दिसणं काही नवीन नाही. आतापर्यंत सापामुळे काही झाल्याचं ऐकीवात नाही. पण साप दिसला की भल्याभल्यांची बोबडी वळते. हा साप पाकिस्तानच्या डगआऊटमधून निघाला होता. सामन्या दरम्यान असं काही घडलं असतं तर चित्र काही वेगळं असतं. पण वेळीच साप दिसला आणि त्याला पकडण्यात यश आलं. ही घटना प्रेमदासा स्टेडियममध्ये 14 फेब्रुवारीला घडली होती.

पाकिस्तानचा संघ कोलंबोत गेल्या दोन दिवसांपासून आहे, संघ सरावासाठी मैदानात जाणार तितक्यात डगआऊटमधून साप निघाला. साप कोणत्या जातीचा होत हे मात्र कळू शकलं नाही. पण त्याला पाहताच विषारी असेल असं काही जणांचं म्हणणं आहे. या मैदानात सर्पदर्शन होत असल्याने ग्राउंड स्टाफ तसा प्रशिक्षित आहे. त्यामुळे त्याने वेळीच सापाला पकडला आणि पिशवीत बंद करून लांब जाऊन सोडलं. सापाला पकडल्याने भारत पाकिस्तान संघावरील मोठं संकट टळलं असं म्हणायला हकरत नाही. जर साप पळून कुठे लपला असता तर मात्र संघ आणि प्रेक्षकांना संपूर्ण सामन्यादरम्यान टेन्शन असतं. कधी चुकून बाहेर पडला असता किंवा एखाद्याला दंश केला असता तर मात्र गोंधळ उडाला असता.

🚨 Snake in Pakistan’s dugout 🐍

A snake was spotted in Pakistan’s dugout during a practice session at the R. Premadasa Stadium in Colombo ahead of the India vs Pakistan T20 World Cup match. pic.twitter.com/BW7J6OBObE

— Sonu (@Cricket_live247) February 14, 2026

मागच्या वर्षी 3 जुलैला कोलंबोत बांग्लादेश श्रीलंका यांच्यात वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात एक मोठा साप दिसला होता. तेव्हा एकच पळापळ झाली होती. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. साप बांगलादेशच्या डावातील तिसऱ्या षटकात मैदानात घुसला होता. यापूर्वी श्रीलंका प्रीमियर 204 स्पर्धेतही सापाचं द्शन झालं होतं. तेव्हाही सामना थांबवण्याची वेळ आली होती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in