• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ Final : भारतासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम अनलकीच, Icc स्पर्धेतील 2 पराभव इथेच, यंदा काय होणार?

March 7, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्मा याने टीम इंडियाला 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. बीसीसीआयने रोहितनंतर मुंबईकर सूर्यकुमार यादव याची भारतीय टी 20i संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. सूर्याने बीसीसीआयचा त्याला कर्णधार करण्याचा निर्णय आतापर्यंत 100 टक्के खरा ठरवून दाखवलाय. सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. तसेच टीम इंडियाने सूर्याच्याच कॅप्टन्सीत आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकला होता. आता सूर्याने टीम इंडियाला कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवलंय.

टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान

टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये ट्रॉफीसाठी न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलंय. टीम इंडियासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम अनलकी राहिलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतासाठी आयसीसी स्पर्धेत अनलकी असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडियाने 2023 पासून ते आतापर्यंत या स्टेडियममध्ये आयसीसी स्पर्धेतील एकूण 3 सामने खेळले आहेत. भारताला या 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलियाने 19 नोव्हेंबर 2023 रोजी टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत करत वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडिया आयसीसी स्पर्धेच्या कोणत्याही प्रकारात अजिंक्य होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात पराभूत केलं. यासह टीम इंडियाची आयसीसी स्पर्धेत सलग 17 सामन्यांत अजिंक्य राहण्याची मालिका नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभूत होण्यासह मोडीत निघाली.

दक्षिण आफ्रिकेने भारताला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी सुपर 8 फेरीत पराभूत केलं होतं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांनी मात केली होती. टीम इंडियाचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला होता. टीम इंडियाची हा आयसीसी स्पर्धेत सलग 17 सामन्यांनंतर पहिला पराभव ठरला होता.

दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाच्या घोडदौडीला ब्रेक

टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनल 2023 नंतर ते टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीपर्यंत सलग आणि एकूण 17 सामने जिंकले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत करत आयसीसी स्पर्धेतील सलग 18 वा सामना जिंकण्यापासून रोखलं आणि ही विजयी मालिका मोडीत काढली.

टीम इंडियाची अहमदाबादमधील टी 20i क्रिकेटमधील आकडेवारी

दरम्यान टीम इंडियाने या मैदानात एकूण 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने यापैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया रविवारी 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करत या मैदानातील एकूण आठवा टी 20i विजय मिळवून वर्ल्ड चॅम्पियन होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in