• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ Final : अभिषेक शर्माचं फायनलमध्ये वादळ, फायर अर्धशतकासह रोहितचा रेकॉर्ड ब्रेक

March 10, 2026 by admin Leave a Comment

अभिषेक शर्मा याला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करावा लागला. अभिषेक साखळी फेरीतील सलग 3 सामन्यांत झिरोवर आऊट झाला. त्यामुळे अभिषेकला प्रचंड टीका सहन करावी लागली. त्यानंतर अभिषेकने झिंबाब्वे विरुद्ध अर्धशतक केलं.अभिषेकसाठी ही खेळी विश्वास वाढवणारी ठरली. मात्र त्यानंतर अभिषेक पुन्हा अपयशी ठरला. मात्र त्यानंतरही टीम मनेजमेंटने अभिषेकवर विश्वास दाखवत त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं. अभिषेकने हा विश्वास अखेर महाअंतिम सामन्यात खरा करुन दाखवला आणि फायर खेळी साकारली.

टीम इंडियाची चाबूक सुरुवात

अभिषेकने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संजू सॅमसन याच्यासह संयमी सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी गिअर बदलला. अभिषेकने स्पर्धेतील संपूर्ण भरपाई करत जोरदार फटकेबाजी केली. अभिषेकने जेकब डफी याने टाकलेल्या सहाव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फोर लगावला. अभिषेकने यासह अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकचं हे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण दुसरं अर्धशतक ठरलं.

अभिषेकची फायर खेळी, रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

अभिषेकने 18 बॉलमध्ये 280 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 51 धावा केल्या. अभिषेकने या अर्धशतकी खेळीत 6 फोर आणि 3 सिक्स ठोकले. अभिषेक यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारा युवराज सिंह याच्यानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने यासह केएल राहुल, रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांना मागे टाकलं.

अभिषेक फायनलमध्ये अर्धशतक करणारा तिसरा भारतीय

अभिषेकने अर्धशतकी खेळीसह खास कामगिरी केली आहे. अभिषेक टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. टीम इंडियासाठी याआधी गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांनी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं.

गौतम गंभीर याने 2007 च्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक 75 धावा केल्या होत्या. विराटने 2014 च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 77 आणि 2024 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती.

अभिषेकच्या खेळीचा शेवट

दरम्यान अभिषेक अर्धशतकानंतर आऊट झाला. रचीन रवींद्र याने अभिषेकला टीम इंडियाच्या डावातील आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर विकेटकीपर टीम सायफर्ट याच्या हाती कॅच आऊट केलं. यासह अभिषेकच्या खेळीचा शेवट झाला. अभिषेकने 21 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. अशाप्रकारे अभिषेक आणि संजूच्या पहिल्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशीपचा शेवट झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in