
टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. भारताने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. भारताने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताची या विजयी धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी अपयशी ठरली. संजू सॅमसन 6 धावांवर बाद झाला. तर अभिषेक शर्मा याला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र त्यानंतरही भारताने हा सामना 16 व्या ओव्हरमध्येच जिंकला. कॅप्टन सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शिवम दुबे या तिघांनी बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
Leave a Reply