• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : मिस्ट्री स्पिनर फायनलमध्ये खेळणार की नाही? कॅप्टन सूर्याने सांगूनच टाकलं

March 7, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 8 मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठी भारताचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंचा सराव अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडियाच्या निशाण्यावर वर्ल्ड कप ट्रॉफी आहे. भारताकडे मायदेशात वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारा संघ हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तसेच एका विजयासह भारत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करेल. त्यामुळे भारतासाठी हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या महाअंतिम सामन्यासाठी खेळाडू सराव करत आहेत. मात्र एका स्टार आणि आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूने त्याच्या कामगिरीमुळे भारताचं टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे या खेळाडूला अंतिम सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याने या खेळाडूची पाठराखण केली आहे.

सूर्या वरुण चक्रवर्तीबाबत काय म्हणाला?

टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर अशी वरुण चक्रवर्ती याची ख्याती आहे. वरुणने टीम इंडियासाठी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत सरस कामगिरी केली. मात्र वरुणला बाद फेरीत टी 20i रँकिंगमधील नंबर 1 गोलंदाज या प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी वरुणला डच्चू देऊ त्याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात यावी, असं म्हटलं जात आहे. मात्र कर्णधार सूर्यकुमारने त्याच्याबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

वरुण चक्रवर्ती याची इंग्लंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये धुलाई

इंग्लंडच्या जेकब बेथल या युवा फलंदाजाने उपांत्य फेरीतील सामन्यात वरुण चक्रवर्ती याच्या बॉलिंगवर 13 चेंडूत 42 धावा ठोकल्या होत्या. तसेच वरुणने त्या सामन्यातील 4 षटकांत एकूण 64 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही सूर्याने आपल्या खेळाडूवर विश्वास कायम ठेवत त्याची पाठराखण केली आहे.

“तो नंबर 1 गोलंदाज”

“वरुणची कामगिरी आमच्यासाठी चिंताजनक नाही. आम्ही सामना जिंकण्याकडे लक्ष देत आहोत. तो (वरुण) नंबर 1 गोलंदाज आहे. त्याला टीमला कसं जिंकवायचं हे माहित आहे. आम्हाला कोणतीही गोष्ट किचकट न करता सहज करायची आहे”, असं म्हणत सूर्यकुमार यादव याने वरुणला पाठिंबा दर्शवला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in