• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : मिचेल सँटनरचा फिनिशिंग टच, भारतासमोर 209 धावांचं आव्हान, रायपूरमध्ये कोण जिंकणार?

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीमने रायपूरमध्ये भारतासमोर दुसर्‍या टी 20i सामन्यात 200 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी मिडल ऑर्डरमध्ये रचीन रवींद्र याने 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मिचेल सँटनर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. सँटनर याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सँटनरने नाबाद 47 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 200 पार पोहचता आलं. सँटनरने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे न्यूझीलंडला भारतासमोर 209 धावांचं हे आव्हान ठेवता आलंय. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत नागपूरनंतर रायपूरमध्ये विजयी होत सलग दुसरा सामना जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग

कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी स्फोटक बॅटिंग करत न्यूझीलंडला 43 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर भारताने न्यूझीलंडला सलग 2 षटकांत झटके देत जोरदार कमबॅक केलं. हर्षित राणा याने डेव्हॉन कॉनव्हे याला आऊट केलं आणि ही जोडी फोडली. हर्षितची कॉनव्हेला आऊट करण्याची ही चौथी वेळ ठरली. कॉनव्हेने 19 धावा केल्या. तर वरुण चक्रवर्ती याने टीम सायफर्ट याला 24 धावांवर इशान किशन याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 43-0 वरुन 43-2 अशी स्थिती झाली.

भारताने झटपट 2 झटके दिल्यानंतर रचीन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ग्लेन फिलिप्स 19 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे 27, 4 आणि 32 धावांची भागीदारी केली. डॅरेल मिचेल 18, रचीन रवींद्र 44 आणि मार्क चॅपमॅन याने 10 धावा केल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जंगी वरात, हळद, मेहंदी..; रितेश-जिनिलियाच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो
  • 60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला
  • Brandy For Cough: ब्रँडी पिण्याने खरंच सर्दी-खोकला बरा होतो का? सत्य काय आहे जाणून घ्या
  • Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण; घाटी लोग म्हणत हिणवल्याचा आरोप; तक्रार दाखल!
  • U19 AUS vs ENG : थॉमस रेवचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलियासमोर 278 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in