• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : भारताने टॉस जिंकला, सूर्यासेना वर्ल्ड कप प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात! संजूबाबत निर्णय काय?

January 31, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20I मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार याने बॅटिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

संजू सॅमननबाबत निर्णय काय?

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप आधी शेवटचा सामना आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. टीम मॅनेजमेंटने लोकल बॉय असलेला ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं आहे. संजूला पहिल्या 4 सामन्यात अपयशी ठरला. संजूला 4 सामन्यात 40 धावाच करता आल्या. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने संजूवर विश्वास दाखवत त्याला कायम ठेवलंय. त्यामुळे संजू आपल्या घरच्या मैदानात वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यात धमाका दाखवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

त्याशिवाय टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्फोटक फलंदाज इशान किशन आणि उपकर्णधार-ऑलराउंडर अक्षर पटेल यांचं कमबॅक झालं आहे. इशानने साधारण दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर रहावं लागलं होतं. तर अक्षरला नागपूरमधील पहिल्या टी 20I सामन्यात हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्यानंतर सलग 3 सामन्यांना मुकावं लागलेलं.

वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिलाच सामना हा 7 तारखेलाच खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपच्या प्लेइंग ईलेव्हनसहच मैदानात उतरलीय, असं म्हटलं जात आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), टीम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन आणि जेकब डफी.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup आधी भारताच्या खेळाडूची कसोटी, 2 सामने खेळणार, कुणाविरुद्ध? जाणून घ्या
  • IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
  • GK : श्रीकृष्णाची सर्वात आवडती बासरी कोणती होती? एकदा वाचाच!
  • बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?
  • Budget 2026: फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेंडिंग करणाऱ्यांना मोठा झटका; बजेटमधल्या घोषणेनं कोसळलं शेअर मार्केट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in