• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : भारताचा रायपूरमध्ये धमाका, न्यूझीलंडला लोळवत पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर दुसऱ्या टी 20I सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडकडून विजयासाठी मिळालेलं 209 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे या मालिकेत आणि रायपूरमधील वीर शहीद नारायण सिंह स्टेडियममध्ये एकूण आणि सलग दुसरा टी 20I सामना जिंकला. भारताने आता या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. तसेच भारताने या विजयासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत करण्यासह पाकिस्तानला झटका दिला आणि ऐतिहासिक कामगिरी केली.

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

भारत टी 20I क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा वेगवान यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने 2025 मध्ये 205 धावांचं आव्हान हे 24 बॉलआधी पूर्ण केलं होतं. तर भारताने 28 बॉलआधी 209 धावांचं आव्हान पूर्ण केलं.

इशान-सूर्याची निर्णायक खेळी

भारताला रायपूरमध्ये विजयी करण्यात इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर शिवम दुबे यानेही सूर्याला चांगली साथ दिली. सूर्या-इशानने तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. शिवम बाद झाल्यानंतर सूर्याने शिवमसोबत फटकेबाजी सुरु ठेवत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. सूर्या-शिवमने नाबाद 81 चेंडूंची भागीदारी केली. सूर्याने सर्वाधिक आणि नाबाद अशा एकूण 82 धावा केल्या. शिवम 36 रन्सवर नॉट आऊट परतला. तर इशानने 76 रन्सचं योगदान दिलं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फेब्रुवारी महिन्यात मोगऱ्याच्या रोपाला कोणते खत द्यावे? जाणून घ्या
  • भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…
  • पाकिस्तान सुपर लीगबाबत स्टीव्ह स्मिथचा मोठा निर्णय, करिअरमध्ये पहिल्यांदाच उचललं असं पाऊल
  • मोटार अपघात क्लेमच्या व्याजावर TDS नाही? नवीन नियम जाणून घ्या
  • कचऱ्यामध्ये सापडलेल्या मुलीला या सुपरस्टारने मारली मिठी, दिलं सुंदर नाव, आता सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in