• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20I सामन्यांतून बाहेर, भारताला मोठा झटका

January 8, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड  यांच्यात (India vs New Zealand) एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीपासून टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताची आगामी टी 20I वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका असणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र त्याआधी भारताला मोठा झटका लागला आहे. भारताच्या मॅचविनर आणि युवा फलंदाजाला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20I मालिकेतील (India vs New Zealand T20I Series 2026)  काही सामन्यांत खेळता येणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma Injury) याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20I सामन्यात खेळता येणार नाही. तिलक पहिल्या 3 सामन्यांतून बाहेर झाला आहे. तर उर्वरित 2 सामन्यांत खेळणार की नाही? हे त्याच्या दुखापतीवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. त्यामुळे आता टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
  • RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
  • Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
  • Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
  • GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in