• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ: टी 20i वर्ल्ड कपआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ, नागपूरमध्ये असं झालं

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी शेवटची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडियासमोर या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचं आव्हान आहे. भारताने बुधवारी 21 जानेवारीला न्यूझीलंडवर 48 धावांनी मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 190 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर करत नागपुरात सलग आणि एकूण चौथा टी 20i विजय साकारला. भारताच्या या विजयानंतरही चिंतेत वाढ झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भारताचे टॉप ऑर्डरमधील 2 अपयशी ठरलेले फलंदाज.

नक्की काय झालं?

विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याने नागपूरमधील सामन्यातून टीम इंडियात 2 वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यामुळे इशानकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा होती. मात्र इशानने निराशा केली. इशानला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तसेच संजू सॅमसन हा देखील नववर्षातील पहिल्याच टी 20i सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. संजू 10 धावा करुन माघारी परतला. इशान आणि संजू दोघेही विकेटकीपर आहेत. या दोघांचा टी 20i वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेआधी शेवटच्या मालिकेत दोघांनी अशी सुरुवात केल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका असल्याने भारतीय खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. अशात हे दोघे अपयशी ठरले. दोघेही विकेटकीपर असल्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकत्र दिसणार नाहीत हे निश्चित आहे.

इशानकडे शेवटची संधी!

संजू सॅमसन हा टीम मॅनेजमेंटची विकेटकीपर म्हणून पहिली पसंत आहे. तसेच इशानला तिलक वर्मा याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे तिलक दुखापतीतून परतल्यास त्याचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार हे निश्चित आहे. त्यामुळे जर इशानला आपला दावा मजबूत करायचा असेल तर त्याला गेम दाखवण्याशिवाय पर्याय नाही.

इशान आणि संजू दोघेही टॉप ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर संघाला आक्रमक तसेच किमान चांगली सुरुवात करुन देणं अपेक्षित असतं. मात्र यात संजू आणि इशान दोघेही ढेर ठरले.

संजूला नागपूरमध्ये सुरुवात तर मिळाली होती. मात्र संजू त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला. संजूने 2 चौकारांसह एकूण 10 धावा केल्या. तसेच इशाननेही कमबॅकमधील सामन्यात 2 चौकारांच्याच मदतीने 8 धावा जोडल्या. आता हे दोघेही दुसऱ्या सामन्यात नागपूरमधील चूक सुधारणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठं मन… स्वस्त थाळी…, अरिजीत सिंगच्या हॉटेलमध्ये मिळतं पोटभर जेवण, मन्यूमध्ये काय असतं?
  • US Tariff On India : आता टॅरिफ कमी केलाय, पण अमेरिकेने भारतासमोर ठेवलीय मोठी अट
  • Gold Jewellery Import: परदेशातून किती आणू शकतो सोन्याचे दागिने? नवीन सीमाशुल्क नियम काय?
  • तुम घाटी लोग सुधरोगे नही… प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, नंतर जे घडलं ते…
  • प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीत फक्त 6 महिन्याचा गॅप? असं कसं? नेटकरी लागले डोकं आपटायला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in