• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : टीम इंडियाची रायपूरमध्ये फिल्डिंग, न्यूझीलंड विरुद्ध 2 खेळाडू टीममधून आऊट, कुणाचा समावेश?

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात नागपूरमध्ये भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र त्यानंतर आता शुक्रवारी 23 जानेवारीला भारताने टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताची नागपूरनंतर रायपूरमध्येही अशीच विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड पहिल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज आहे.

दोन्ही संघात बदल

रायपूरमधील या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. भारताला त्यापैकी 1 बदल नाईलाजाने करावा लागला आहे. भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल याला दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20I सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. अक्षरला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली होती. तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच अक्षरच्या जागी कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आला आहे. तर बुमराहच्या जागी हर्षित राणा याला संधी मिळाली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, टीम सायफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, झॅक्री फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Big Losers: अख्खा संघ 50 धावांच्या आत गारद, T20 विश्वचषकात सर्वात कमी धावा करणारे संघ कोणते?
  • आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली..; मराठमोळ्या अभिनेत्रीने फोडला टाहो
  • Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं
  • ग्रीन टी ब्लॅक कॉफीला म्हणा NO….! ‘या’ प्रकारे कॉफी प्यायल्यामुळे होईल झटपट वेट लॉस…..
  • India Tariffs : अमेरिकेने भारताचा केला मोठा गेम, टॅरिफ कमी केला पण…ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in