• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : गुवाहाटीत तिसऱ्या टी 20I चा थरार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

January 24, 2026 by admin Leave a Comment

नागपूर, रायपूरनंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार हा गुवाहाटीत रंगणार आहे. उभसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं. भारताने दोन्ही सामने एकतर्फी फरकाने जिंकत आपला दबदबा कायम राखला. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा टी 20i सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना रविवारी 25 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.


टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?


टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

संजू समॅसन याला पुन्हा संधी मिळणार का?

दरम्यान तिसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला पु्न्हा संधी मिळणार का? असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. संजूला निवड समितीने नागपूर आणि त्यानंतर रायपूरमध्ये झालेल्या दोन्ही टी 20i सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र संजूने दोन्ही सामन्यात बॅटिंगने घोर निराशा केली. अशात आता टीम मॅनेजमेंट संजूला सलग तिसऱ्या सामन्यात संधी देत  पुन्हा विश्वास दाखवणार की त्याचा पत्ता कट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं
  • सोन्याने भरलेली बॅग पाहूनही ती डगमगली नाही; रजनीकांत यांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला थेट घरी बोलावलं अन्..
  • Railway Budget 2026 : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, बजेटमध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी; 5 मोठ्या घोषणा काय?
  • Tanaji Sawant: थांब, तुझी एन्क्वायरीच लावतो, भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवाराला दम
  • रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देणार, पुणे-हैदराबाद-चेन्नई थेट नवीन गाड्या…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in