• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ: आज रात्री आम्ही…! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान

March 8, 2026 by admin Leave a Comment


टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मिचेल सँटनरने पॅट कमिन्ससारखी वल्गना करून भारताला डिवचलं होतं. इतकंच काय तर अहमदाबाद स्टेडियमधील प्रेक्षकांना गप्प करू असंही म्हणाला होता. तसेच खेळपट्टीचे फोटो काढून पॅट कमिन्सची स्टाईलही मारली होती. नाणेफेकीचा कौलही सँटनरच्या बाजूने लागला. पण टीम इंडियाने सँटनरच्या या वक्तव्याची सर्व हवाच काढून टाकली. नाणेफेकीचा न्यूझीलंडने जिंकला असला तरी या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड दिसली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. इशान किशनने त्यात आणखी भर घातली. शिवम दुबेने शेवटी फटकेबाजी करून न्यूझीलंडच्या विजयाची हवा काढून टाकली. 255 धावांचा पाठलाग करणं काही सोपी गोष्ट नाही हे कळून चुकलं होतं. त्यामुळे भारताचा विजय हा पहिल्या डावातच निश्चित झाला होता. हा सामना भारताने 96 धावांनी जिंकला. जेतेपद हुकल्यानंतर मिचेल सँटनरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, “अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याबद्दल मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहेच, संपूर्ण स्पर्धेत आमच्यासमोर किती आव्हाने होती, पण आम्ही प्रत्येक आव्हानावर तितक्याच ताकदीने मात केली आणि चांगले खेळलो. तआज रात्री एका चांगल्या संघाने आणि या मोठ्या प्रेक्षकांसमोर आमच्यासमोर एक उत्तम खेळ दाखवला. तरीही मला माझ्या मुलांचा अभिमान आहे.” या सामन्यात न्यूझीलंडचा कुठे नव्हता. खऱ्या अर्थाने हा सामना एकतर्फी झाला असंच म्हणावं लागेल.

मिचेल सँटनर पुढे म्हणाला की, “हो, मला वाटते की प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी घेतली. मला वाटते की आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना करावा लागला आणि पुढे जाणे नक्कीच चांगले होते. आम्ही सुपर 8 मध्ये आणि नंतर उपांत्य फेरीत खरोखर चांगले खेळलो, पण मला वाटते की आज रात्री आम्ही कमी पडलो.” भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात तिसरं जेतेपद आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in