• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : अभिषेक-सूर्या फ्लॉप, शिवमची झुंज अपयशी, भारताचा 50 धावांनी पराभव, न्यूझीलंडने सलग चौथ्या विजयापासून रोखलं

January 28, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत सलग चौथा सामना जिंकण्यात अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये भारतासमोर 216 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताने याआधी 209 धावांचाच यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी विक्रमी धावसंख्या गाठण्याचं आव्हान होतं. मात्र भारताला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने भारताला 8 बॉलआधीच गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचा डाव हा 18.4 ओव्हरमध्ये 165 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने यासह या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

न्यूझीलंडच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी

भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम सायफर्ट (62) आणि डेव्हॉन कॉनव्हे (44) या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. तसेच डॅरेल मिचेल याने 39 आणि ग्लेन फिलिप्स याने 24 धावांचं योगदान दिलं. तर इतरांच्या मदतीने न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीकडून भारताला वेगवान सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडने भरताला पहिल्याच बॉलवर मोठा झटका दिला.

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात

अभिषेक शर्मा हा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. संजू सॅमसन आणि रिंकु सिंह या दोघांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. संजू 24 आणि रिंकुने 39 धावा केल्या. हार्दिकने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

भारताचा पराभव

New Zealand win the 4th T20I by 50 runs in Vizag.#TeamIndia lead the series 3⃣-1⃣

Scorecard ▶ https://t.co/GVkrQKKyd6 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zkfXdvEwGD

— BCCI (@BCCI) January 28, 2026

शिवमची वादळी खेळी

हर्षित राणा आणि शिवम दुबे या जोडीने फक्त 27 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. शिवमने या दरम्यान फक्त 15 चेंडूत 6 षटकारांसह वादळी अर्धशतक झळकावलं. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. मात्र शिवम नॉन स्ट्राईक एंडवर दुर्देवीरित्या आऊट झाला. शिवम आऊट होताच भारताची विजयाची आशा मावळली. शिवमने अवघ्या 23 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरसह सर्वाधिक 65 रन्स केल्या.

शिवम आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या उर्वरित फलंदाजांना झटपट आऊट केलं आणि डाव गुंडाळला. न्यूझीलंडसाठी कॅप्टन मिचेल सँटनर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. इश सोढी आणि जेकब डफी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री आणि झॅकरी फॉल्क्स या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 3rd February 2026 : भावा-बहिणींसोबत मिटेल दुरावा, मूव्हीचा प्लान आणि… वाचा आजचं भविष्य
  • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर मोठं संकट! तब्बल 8 जिल्ह्यांना मोठा इशारा, विजांच्या कडकडाटासह…
  • Gold Rate : बापरे! सोन्याचा भाव थेट 3 लाख रुपये, आकडा पाहून सामान्यांची उडाली झोप!
  • ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी
  • मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in