• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NED : टीम इंडियाचा विजयी चौकार, नेदरलँड्सवर 17 धावांनी मात

February 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपली विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँड्सनेही जोरदार झुंज देत शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचे प्रयत्न अपुरे पडले. नेदरलँड्सला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे साखळी फेरीतील आपला सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. तर नेदरलँड्स वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.  ऑलराउंडर शिवम दुबे हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.  शिवमने भारतासाठी सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानंतर दुबेने 2 विकेट्सही मिळवल्या. दुबेला या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं.

कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 76 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला 193 धावांपर्यंत पोहचता आलं. शिवम दुबे याने 31 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 66 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 34 आणि हार्दिकने 30 धावांचं योगदान दिलं. तसेच तिलक वर्मा याने 31 रन्स केल्या. तर नेदरलँड्ससाठी लोगन वॅन बीक याने 3 विकेट्स मिळवल्या. तर आर्यन दत्त याने दोघांना आऊट केलं.

नेदरलँड्सची जोरदार झुंज

नेदरलँड्सच्या आर्यन दत्त याला भोपळाही फोडता आला नाही. तर लोगन वॅन बीक हा 4 धावांवर नाबाद परतला. या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या इतर 7 फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा शानदार सामना करत दुहेरी आकडा गाठला. मात्र यापैकी एकालाही 33 पार पोहचता आलं नाही. नेदरलँड्ससाठी बास दी लिडे याने सर्वाधिक 33 धावा केल्या. मायकल लेविट याने 24, मॅक्स ओडॉड याने 20 धावांच योगदान दिलं. कुलीन एकरमॅन याने 23 रन्स केल्या. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 15, झॅक लायन-कॅशे 26 आणि नोहा क्रोएस याने नाबाद 25 धावा केल्या.

शिवमची बॅटिंगनंतर बॉलिंगने कमाल

टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती याने 3 विकेट्स मिळवल्या. शिवम दुबे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 1-1 विकेट मिळवली. टीम इंडिया या सलग चौथ्या विजयासह साखळी फेरीत ए ग्रुपमधून नंबर 1 ठरली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in