• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG T20 World Cup : इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकायचीय तर आता या चुका नाही चालणार, वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकलो पण चुकलो कुठे?

March 5, 2026 by admin Leave a Comment

India vs England SemiFinal in T20 World Cup 2026 : सुपर-8 च्या महत्वाच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 5 विकेटने हरवलय. भारताच्या विजयात संजू सॅमसनचं महत्वाचं योगदान होतं. तो नाबाद 97 धावांची इनिंग खेळला. टीमच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. भले, हा सामना भारताने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असेल, पण भारताच्या विजयातही काही चूका झाल्या.

सेमीफायनल आधी त्या चूका दुरुस्त करणं गरजेचं आहे. इंग्लंड विरुद्धच्या मॅचआधी सुधारणा करणं गरजेचं आहे. इंग्लंड या टुर्नामेंटमध्ये अशी एक टीम आहे, ज्यांच्या प्रदर्शनात सामन्यागणिक सुधारणा झाली आहे.

एखादा दिवस तो सुद्धा खराब खेळू शकतो

टीम इंडिया जसप्रीत बुमराहवर जास्त अवलंबून आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. वरुण चक्रवर्तीने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलेलं नाही. बुमराहवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे. बुमराहची या T20 WC मध्ये फक्त 6.3 रन्स प्रति ओव्हर एक शानदार सरासरी आहे. पण बुमराह काही मशीन नाही. एखादा दिवस तो सुद्धा खराब खेळू शकतो. इंग्लंड विरुद्ध सामन्याच्यावेळी त्याचा खराब दिवस नसावा अशीच चाहत्यांची इच्छा असेल.

दुसरी मोठी चूक काय?

वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात भारताने खूप खराब फिल्डिंग केली. 3 कॅच सुटल्या. वेस्ट इंडिज विरुद्ध अभिषेक शर्माने दोन सोपे झेल सोडले. करो या मरो सामन्यात अभिषेकने रॉस्टन चेजचा सोपा झेल सोडला. त्याचा फायदा उचलत त्याने 15 च्या 40 धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजची टीम 195 धावांपर्यंत पोहोचली. त्याशिवाय अभिषेकने रोव्हमॅन पॉवेलची सुद्धा कॅच सोडली. तिलक वर्माने सुद्धा कॅच सोडली. तिलकने वेस्ट इंडिजच्या इनिंगमध्ये 13 व्या ओव्हरमध्ये शेरफेन रदरफोर्डची कॅच सोडली.

भारताने आतापर्यंत किती कॅच सोडल्यात?

या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने खूप खराब फिल्डिंग केली आहे. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारताने आतापर्यंत 13 झेल सोडले आहेत. हा चिंतेचा विषय आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक कॅच सोडले आहेत.

सूर्याने कसं खेळलं पाहिजे?

कॅप्टन सूर्यकुमार यादवला सेमीफायनलमध्ये मॅच विनिंग इनिंग खेळावी लागेल. सूर्या या टुर्नामेंटमध्ये भारताचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर आहे. सूर्याने सेमीफायनलमध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली तर इंग्लंडला हरवणं कठीण नसेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in