• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG 2nd Semi Final: पावसामुळे बिघडणार भारत-इंग्लंड सेमीफायनलचा खेळ ? मुंबईत आज काय होणार ?

March 5, 2026 by admin Leave a Comment

IND vs ENG, 2nd Semi Final : मुंबईतलं वानखेडे स्टेडियम हे पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज मॅचसाठी सज्ज झालं आहे. टी-20 वर्ल्डकपमधील सेमी-फायनलचा दुसरा सामना आज वानखेडेवर रंगणार असून, भारत आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या महाुकबल्याबज्जल प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असून मोठा उत्साह जाणवत आहे. इंग्लंड की भारत, फायनलमध्ये कोण धडक मारणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो मुंबईच्या हवामानाचा. मुंबईत आज हवामाना, एकंदर वातावरण कसं असेल, क्रिकेट प्रेमींना सर्वात मोठी भीती वाटत्ये ती पावसाची. आज मुंबईत वातवरण कसं असेत ते जाणून घेऊया.

फायनलचं तिकीट कोणाला ?

आजच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. काल कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव केला. फिन ॲलनच्या स्फोटक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारत-इंग्लंड सामन्यावर आहे. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत पोहोचेल, आणि तिथे जेतेपदासाठी एक चुरशीची लढत होईल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज आहे.

आज मुंबईत कसं असेल हवामान ?

आजच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, चाहत्यांसाठी काहीसा दिलासा आहे. AccuWeather च्या मते, सामन्यादरम्यान मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, जे खेळाडूंसाठी अनुकूल मानलं जातं. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना थोडा त्रास होऊ शकतो.

दोन्ही संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रिंकू सिंह.

इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बैंटन, जैकब बेथेल, जोस बटलर, सैम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जैक्स, जेमी ओवरटन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in