• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG : हॅरी ब्रूकची 1 चूक, भारताला 74 धावांचा फायदा, इंग्लंड सामना गमावणार!

March 6, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी खेळी साकारली. संजूने नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला करो या मरो सामन्यात शानदार आणि एकतर्फी असा विजय मिळवून दिला. संजूच्या खेळीमुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक दिली. संजूने विंडीज विरुद्धचा तडाखा सेमी फायनलमध्येही कायम ठेवत धमाका केलाय.

संजूने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये वादळी खेळी करुन चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. संजूने इंग्लंड विरुद्ध 89 धावांची खेळी केली. संजूचं शतक अवघ्या 11 धावांनी हुकलं. मात्र इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने 1 चूक केली नसती तर संजू इथवर पोहचलाच नसता. हॅरीच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला मोठा फायदा झालाय. तर इंग्लंडला मोठा फटका बसला. हॅरीची ही चूक इंग्लंडच्या पराभवासाठी कारणीभूत ठरु शकते. हॅरीने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन हॅरी ब्रूकची घोडचूक

इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. संजू टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत होता. त्यामुळे इंग्लंड विकेटच्या शोधात होती. हॅरीने सलामी जोडी फोडण्यासाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला बॉलिंगची संधी दिली. जोफ्रा टीम इंडियाच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. हॅरीने आर्चरला ज्यासाठी ओव्हर दिली त्याने ते काम यशस्वीरत्या केलं. मात्र हॅरीने घोडचूक केली.

हॅरीकडून संजूला जीवनदान

Ohhhhh, Harry Brook! 😳

Sanju Samson makes the most of the lifeline and sends it into the stands! 🚀

ICC Men’s #T20WorldCup | Semi-final 2 | #INDvENG | LIVE NOW 👉 https://t.co/L2OuYBUDbL pic.twitter.com/zOWfIEAdUv

— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026

जोफ्रा आर्चर याने टाकलेल्या सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर संजूने फटका मारला. संजूने मारलेला फटका थेट हॅरी ब्रूक याच्या हातातच गेला. त्यामुळे संजू आऊट झाल्याच जमा होता. मात्र हॅरीने संजूचा सोपा कॅच सोडला. हॅरीकडून संजूला 15 धावांवर जीवनदान मिळालं. संजूने या संधीचा पूर्ण फायदा घेत सामन्याचं संपूर्ण चित्र बदललं.

संजूने या जीवनदानाचं फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. संजूने 26 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. तर संजू शतकाच्या दिशेने होता. संजूला शतकाची संधी होती. मात्र संजू आऊट झाला. विल जॅक्स याने संजूला फिलीप सॉल्ट याच्या हाती कॅच आऊट केलं. संजूने 42 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोर ठोकत 89 रन्स केल्या. विलने संजूला आऊट केल्याने इंग्लंडची डोकेदुखी काही अंशी कमी झाली. मात्र हॅरी ब्रूकची एक चूक इंग्लंडला अशाप्रकारे 74 धावांनी महागात पडली. आता हॅरीने कॅच सोडली की मॅच सोडली? हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in