• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG : सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड भिडणार!

February 27, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंडने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर मात करत सुपर 8 फेरीतील सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. इंग्लंडला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने 19.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. इंग्लंडचा न्यूझीलंड विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. न्यूझीलंडला हा सामना जिंकून सहज सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने विजयी घोडदौड कायम राखत न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचंही उपांत्य फेरीतील आव्हान कायम राहिलं आहे. पाकिस्तानने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध आवश्यक नेट रनरेटने विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

तसेच इंग्लंडच्या विजयामुळे सेमी फायनलमध्ये कोणते 2 संघ आमनेसामने असणार? हे समीकरण जुळताना दिसत आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी रविवारी 1 मार्चला वेस्ट इंडिज विरुद्ध सुपर 8 मधील आपला तिसरा आणि अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर 8 मधील निर्णायक सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे.

तर इंडिया-इंग्लंड सेमी फायनल

टीम इंडिया विंडीज विरुद्ध जिंकल्यास सेमी फायनलमध्ये प्रवेश अधिकृतरित्या प्रवेश करेल. टीम इंडिया या विजयासह ग्रुप 1 मधील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल. तसेच आयसीसीच्या नियमानुसार, ग्रुप 2 मधील अव्वल संघ आणि ए ग्रुपमधील दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघासह उपांत्य फेरीतील सामना होणार आहे.  इंग्लंड ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे टीम इंडिया रविवारी 1 मार्चला विंडीजला पराभूत करताच उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध खेळणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार.

भारत-इंग्लंड सामना कुठे होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीतील संभाव्य सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 5 मार्च रोजी होणार आहे.

सेमी फायनलमध्ये 1-1 ने बरोबरी

दरम्यान आतापर्यंत इंडिया-इंग्लंड टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 2 वेळा सेमी फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. इंग्लंडने भारताला 2022 मध्ये पराभूत केलं होतं. तर टीम इंडियाने 2024 मध्ये या पराभवाची परतफेड करत फायनलमध्ये धडक दिली होती. आता समीकरण जुळल्यास दोन्ही संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी एकमेकांविरुद्ध 2 हात करताना दिसतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in