• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG : परिस्थिती पाहून गंभीर यांनी पटकन अशी चाल खेळली की.. याच मास्टर स्ट्रोकने टीम इंडियाला मिळवून दिलं फायनलचं तिकिट

March 6, 2026 by admin Leave a Comment

IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री चाहत्यांना क्रिकेटचा थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने इंग्लंडला 7 धावांनी हरवून टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता 8 मार्चला रविवारी टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या विजयाची खरी स्टोरी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्या प्लानिंगमध्ये दडली आहे. मॅचमध्ये इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. त्यावेळी कोच गंभीर यांनी धक्का तंत्राचा वापर केला. त्यांनी शिवम दुबेला नंबर 4 वर फलंदाजीला पाठवलं. दुबे लेग स्पिनरला दूर-दूरपर्यंत मारु शकतो हे गंभीर यांना माहित होतं. म्हणून त्यांनी शिवम दुबेला चौथ्या नंबरवर फलंदाजीला पाठवलं.

याआधी नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यातही शिवम दुबेने चौथ्या नंबरवर येऊन 66 धावा तडकावल्या होत्या. तो प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. शिवम दुबेला चौथ्या नंबरवर पाठवण्याची चाल यशस्वी ठरली. त्याने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यामुळे रशीद दबावाखाली आला आणि इंग्लंडची रणनिती फेल झाली.

हा बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडला

सर्वात जास्त हैराण करणारा निर्णय म्हणजे तिलक वर्माचा फलंदाजीचा क्रम बदलणं. तिलक वर्माला तीन नंबर वरुन थेट 7 व्या नंबरवर फलंदाजीला आणणं. पहिल्यांदा कोणीतरी तिलकला इतक्या खाली खेळताना पाहिलय. शेवटच्या ओव्हर्समध्ये पहिल्या चेंडूपासून सिक्स मारण्याची क्षमता असलेला खेळाडू क्रीझवर हवा हा विचार त्यामागे होता. म्हणून तिलकच्या फलंदाजीचा क्रम बदलला, जो टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. तिलकने 7 चेंडूत 21 धावा चोपल्या.

..तर निकालही अपेक्षित येतो

भारत आणि इंग्लंडच्या जय-पराजयामध्ये फक्त 7 धावांचं अंतर आहे. तिलकच्या छोट्याशा पण तितक्याच महत्वाच्या इनिंगकडे जय-पराजयामधलं अंतर म्हणून पाहता येईल. बुद्धीबळाच्या पटावर जशा चाली रचल्या जातात, तशाच गंभीर यांनी डगआऊट एरियामध्ये बसून हे झटपट निर्णय घेतले. कॉमेंट्री बॉक्समधील माजी क्रिकेटरही यामुळे थक्क झाले. सेमीफायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग ऑर्डरमध्ये इतका मोठा धोका पत्करेल हा विचार कोणीच केला नव्हता. धोका पत्करण्याची तयारी असेल तर निकालही अपेक्षित येतो हे गंभीर-सूर्याच्या जोडीने दाखवून दिलय. आता सगळ्यांच्या नजरा 8 मार्चला होणार्‍या भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यावर आहेत.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in