• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AUS : टीम इंडिया गुरुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार, सामना किती वाजता? जाणून घ्या

February 18, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात (Women India Tour Of Australia 2026) विजयाने केली. भारताने रविवारी 15 फेब्रुवारीला पहिल्या टी 20I सामन्यात ऑस्ट्रेलियावर डीएलएसने विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियाने डीएलएसनुसार 21 धावांनी मात केली. भारतीय महिला संघाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी आर या पार असा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20I सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना कधी?

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना गुरुवारी 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना कुठे?

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वुमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध किती सामने जिंकलेत?

टी 20i क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 36 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने टी 20i क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियावर कुरघोडी केल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमने भारताविरुद्ध 36 पैकी 26 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने 8 सामने जिंकले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर 1 मॅच बरोबरीत राहिली. अशात आता उभयसंघातील 37 व्या सामन्यात दोघांपैकी कोण मैदान मारणार? हे जाणून घेण्यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in