• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AUS : उपकर्णधार स्मृती मंधाना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ढेर, 15 चेंडूत 2 वेळा आऊट, टीम इंडिया अडचणीत

March 7, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 ट्रॉफी आपल्या नावावर करण्यापासून एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया आणि या ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड उभी आहे. ही ट्रॉफी कोण जिंकणार हे रविवारी 8 मार्च रोजी निश्चित होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा आणि एकमेव कसोटी सामना खेळत आहे. टीम इंडिया या सामन्यात बॅकफुटवर आहे. तसेच या सामन्यात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने निराशा केली आहे. स्मृती दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.

स्मृती एकमेव कसोटीत अपयशी

स्मृतीसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा हा समिश्र स्वरुपाचा राहला. स्मृतीने टी 20I मालिकेत आपली चमक दाखवली. मात्र स्मृती कसोटी सामन्यात आपली लय कायम ठेवण्यात अपयशी ठरली. स्मृतीला या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत दुहेरी आकडा गाठता आला नाही.स्मृती पर्थमधील वाका स्टेडियममध्ये पहिल्या दिवशी पहिल्या डावात 4 धावांवर बाद झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने स्मृतीला दुसऱ्या डावात 2 रन्सवर आऊट केलं. स्मृतीने अशाप्रकारे या एकमेव मात्र निर्णायक सामन्यात 15 चेंडूत फक्त 6 धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

उभयसंघात 6 मार्चपासून हा सामना खेळवण्यात येत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच दिवशी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या डावात 200 धावाही करुन दिल्या नाहीत. भारताला 198 धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 323 धावा केल्या आणि 125 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज अपयशी

आता टीम इंडियाला पहिल्या डावातील अपयश विसरून दुसऱ्या इनिंगमध्ये कमबॅक करुन मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना तसं करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला 6 विकेट गमावून 29 षटकांत 105 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 20 धावांनी पिछाडीवर आहे. स्नेह राणा आणि काश्वी गौतम ही जोडी तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करतील. त्यामुळे या दोघी भारतासाठी कसा खेळ करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एनाबेल सदरलँडचा शतकी तडाखा

दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी ऑलराउंडर एनाबेल सदरलँड हीने पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. एनाबेलने 129 धावा केल्या. एनाबेलचं हे सलग तिसरं कसोटी शतक ठरलं. एनाबेल यासह ऑस्ट्रेलियासाठी सलग 3 शतक करणारी पहिली महिला फलंदाज ठरली. एनाबेल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासाठी एलिसा पेरी हीने 76 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आघाडी घेता आली. आता रविवारी 8 मार्चला सामना निकाला निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in