• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND A vs USA : भारताची वर्ल्ड कपआधी दणक्यात सुरुवात, यूएसएचा 38 धावांनी धुव्वा

February 2, 2026 by admin Leave a Comment


इंडिया ए टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सराव सामन्यात दणक्यात सुरुवात केली आहे. आयुष बडोनी याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सराव सामन्यात यूएसएला 38 धावांनी लोळवलं आहे. इंडिया ए टीमने यूएसएसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएसएनेही प्रतिकार केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर यूएसएला जिंकणं सोडा पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने आयुष बडोनी याच्या नेतृत्वात यूएसएला 19.4 ओव्हरमध्ये 200 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आप्ल्या नावावर केला. या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 438 धावा केल्या. तसेच सामन्यात दोन्ही बाजूने 21 षटकार लगावण्यात आले.

एन जगदीशन हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. जगदीशन याने बॅटिंगने सर्वाधिक 103 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन आयुष बडोनी याने अर्धशतक झळकावलं. तसेच तिलक वर्मा आणि प्रियांश आर्या यांनीही धावा जोडल्या. त्यानंतर रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तसेच खलील अहमद आणि नमन धीर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवून यूएसएला गुंडाळण्यात योगदान दिलं.

जगदीशन 49 चेंडूत शतक झळकावंल. जगदीशनने 55 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 11 फोरसह एकूण 104 रन्स केल्या. आयुषने नॉट आऊट 60 रन्स केल्या. प्रियांश आर्या याने 28 धावा जोडल्या. तर तिलक वर्मा याने कमबॅकमधील या सामन्यात 38 धावांची सन्मानजनक खेळी साकारली. यूएसएकडून तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

यूएसएची बॅटिंग

यूएसएकडून साईतेजा मुक्कामल्ला (0) याचा अपवाद वगळता पहिल्या 8 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र यापैकी एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. यूएसएसाठी अँड्रिज गॉस याने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर संजय कृष्णामूर्ती याने 41 धावांचं योगदान दिलं. तिघांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. तर इतरांनी त्याआधीच गुडघे टेकले आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

पुढील सराव सामना केव्हा?

दरम्यान आता भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणारा मुख्य संघ एकमेव सराव सामना हा 4 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. तर इंडिया ए टीमचा शेवटचा सराव सामना हा नामिबिया विरुद्ध 6 फेब्रुवारीला होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India vs Pakistan: तरच टीम इंडिया विरुद्ध खेळणार! पाकिस्तानची अट काय? जाणून घ्या
  • WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, यूपी रोखणार?
  • शाहरुख खान – गौरी यांच्या लग्नात नीलम कोठारीने बजावली महत्त्वाची भूमिका, अनेक वर्षांचं सत्य समोर
  • Chanakya Niti : या पाच ठिकाणी शांत बसणंच हिताचं, अन्यथा मृत्यूशी पडू शकते गाठ
  • सर्वात मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले, आता फक्त ‘इतका’ कर लागणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in