• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IAS, IPS, IFS की IRS; कोणाला मिळतो सर्वात जास्त पगार, कुणाची ताकद जास्त?

March 9, 2026 by admin Leave a Comment


अलिकडेच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात पास झालेले विद्यार्थी अधिकारी बनून देशाची सेवा करताना दिसणार आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांवर जसे की IAS, IPS,IFS आणि IRS अधिकारी होण्याची संधी मिळते. या पदांवर काम करणारे अधिकारी देशाचे प्रशासन, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्था सांभाळतात. आज आपण यापैकी कोणत्या अधिकाऱ्याला सर्वात जास्त पगार मिळतो? सर्वात जास्त ताकद कोणत्या अधिकाऱ्याची असते ते जाणून घेऊयात.

IAS (भारतीय प्रशासकीय सेवा)

IAS अधिकारी प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा भाग मानले जातात. त्यांचे मुख्य काम म्हणजे सरकारने बनवलेल्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणे हे आहे. एखाद्या जिल्ह्यात IAS अधिकाऱ्याची नियुक्ती साधारणपणे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून केली जाते. जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणे, विकासकामांवर देखरेख ठेवणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही आयएएस अधिकाऱ्याची कामे असतात.

IPS (भारतीय पोलीस सेवा)

IPS अधिकारी देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. हे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी असतात. जिल्ह्यात IPS अधिकारी साधारणपणे SP किंवा SSP म्हणून काम करतात आणि संपूर्ण पोलीस दलाचे नेतृत्व करतात. गुन्हे रोखणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, दंगल किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळणे ही कामे IPS अधिकाऱ्याला करावी लागतात.

IFS (भारतीय परराष्ट्र सेवा)

IFS अधिकारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. त्यांचे काम भारत आणि इतर देशांमधील संबंध मजबूत करणे असते. IFS अधिकारी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात. ते राजदूत, हाय कमिशनर, दुतावास अधिकारी अशा विविध पदांवर काम करतात.

IRS (भारतीय महसूल सेवा)

IRS अधिकारी देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे अधिकारी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. आयकर आणि GST सारख्या करांचे व्यवस्थापन करणे, करचोरी रोखणे, आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणे, सरकारचा महसूल वाढवणे ही कामे आयआरएस अधिकारी करतात.

IAS, IPS, IFS, IRS मध्ये सर्वाधिक पगार कोणाला मिळतो?

या सर्व अधिकाऱ्यांचा पगार जवळपास समान असतो. या अधिकाऱ्यांना बेसिक पगार सुमारे ₹56,100 प्रति महिना आणि विविध भत्त्यांसह एकूण पगार सुमारे ₹85,000 ते ₹1,00,000 प्रति महिना मिळतो. अनुभव आणि पद वाढल्यावर पगारही वाढत जातो. सर्वाधिक पगार कॅबिनेट सचिव (IAS) या पदावर मिळतो, जो सुमारे ₹2,50,000 प्रति महिना असतो.

सर्वात जास्त ताकद कोणत्या अधिकाऱ्याकडे ?

प्रशासकीय शक्तीच्या दृष्टीने सामान्यतः IAS अधिकारी सर्वात प्रभावशाली मानले जातात, कारण जिल्ह्याचे प्रशासन, बजेट आणि विकास योजना त्यांच्या नियंत्रणाखाली असतात. तर IPS अधिकारी पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतात. IFS अधिकारी परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. IRS अधिकारी आर्थिक आणि करसंबंधी व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या चारही सेवांची कामे वेगवेगळी असली तरी प्रत्येक सेवेचे देशाच्या व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केळीच्या साली फेकून देताय? असं करु नका, सालीपासून बनवा चविष्ट चटणी
  • 1034 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासोबत आशा भोसले यांनी गायलेलं खास गाणं, ICC स्पर्धेदरम्यान झालं होतं रिलीज
  • Asha Bhosale : आजही ट्रेंड करतायेत आशा ताईंची ‘ही’ गाणी, Reels वर तर जादू
  • Asha Bhosle Passed Away | आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज म्हणजे…
  • Asha Bhosle : निधनानंतर आशा भोसले यांची अखेरची पोस्ट व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in