• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…

April 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इराण संघर्षादरम्यान बुधवारी युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची भेट होणार आहे. मात्र याच दरम्यान होर्मुजच्या सामुद्रधुनीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार, इराणची इच्छा असली तरीही ते होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करू शकत नाही. या मागचं एक मोठं कारणही समोर आलं आहे. होर्मुजची सामुद्रधनी उघडता येत नाहीये, कारण त्यांनी पेरलेले सागरी सुरुंग त्यांनाच शोधता येत नाहीयेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, इराणने गेल्या महिन्यातील युद्धादरम्यान लहान जहाजांचा वापर करून होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरले होते. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे पद्धतशीर नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, अनके सुरुंगांच्या जागांची नीट नोंद ठेवली गेली नव्हती तर काही सुरूंग हे समुद्राच्या प्रवाहामुळे वाहूनही गेले आहेत. यामुळेच आता त्यांना हटवणे हे इराणपुढंल एक मोठं तांत्रिक आव्हान आहे. त्यामुळेच जोपर्यंत हे सुरुंग शोधले जात नाहीत, ते सापडत नाहीत तोरपर्यंत हा मार्ग जहाजांसाठी धोकादायक आहे. .

इराणसमोर दुहेरी समस्या

न्यूयॉर्क टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेला संघर्ष जवळपास 40 दिवस चालला होता. या संघर्षादरम्यान दोन्ही देशांना चोख प्रत्युत्र देताना,इराणने सामारिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली, त्याची नकेबंदी केली. यामुळे जगातील सर्वच देशांत उर्जा संकट निर्माण झालं. ही सामुद्रधुनी बंद करतानाच, इराणने लहान जहाजांचा वापर करून तिथे मोठ्या संख्येने सुरुंग पेरले. पण ही काही एक पद्धतशीर लष्करी कारवाई नव्हती. हे सुरूंग अनेक ठिकाणी पेरले, पण अनेक सुरू्ंगांची नोंद नव्हती, तर काही सुरूंग अशा प्रकारे पेरले गेले, ते सागरी प्रवाहामुळे वाहून जाऊ शकतात, इकडे तिकडे विस्थापित होऊ शकतात. यामुळे इराणसमोर दुहेरी समस्या निर्माण झाली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे, सर्व सुरुंग कुठे आहेत हे इराणला माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांना ज्या सुरूंगाबाबत माहीत आहे, ते सुरूंग काढण्याची तांत्रिक क्षमतासुद्धा मर्यादित आहे. यामुळेच”तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन” होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यात येईल, असं विधान इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी अलीकडेच केलं होतं. हे विधान थेट सुरुंगांच्या समस्येशी संबंधित असल्याची पुष्टी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र असं असलं तरी , ब्रिटनकडे सुरुंग काढण्याचे तंत्रज्ञान आहे आणि ते त्यावर काम करू शकतात. इराण त्याची मदत घेईल की नाही हे

होर्मुजचं महत्व

होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील तेल आणि एलएनजीच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के पुरवठा या सामुद्रधुनीतून जातो. तेथील खाणकामाचे परिणाम केवळ प्रादेशिकच नव्हे, तर जागतिक स्तरावरही झाले आहेत. तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि जलवाहतुकीत झालेली घट हे त्याचेच परिणाम आहेत. अहवालानुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराणने काही जहाजांना एक मर्यादित सुरक्षित मार्ग खुला ठेवला आहे. मात्र असं असलं तरी हा मार्ग अत्यंत अरुंद असून, आजूबाजूचा बराचसा परिसर अनिश्चित आणि धोकादायक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in