
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या बद्दल वाचल्यानंतर तुम्हालाही प्रचंड चीड येईल. व्यवस्था कशी पोखरुन गेलीय. माणसापेक्षा पैशाला किती किंमत आहे आणि पैसा मिळवण्यासाठी माणसाच्या आयुष्याशी कसं खेळलं जातं, ते या सगळ्या प्रकारातून समोर आलय. खरंतर अशा या आयसीटीसी सेंटर्सवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जे कोणी अशा प्रकारांना जबाबदार आहेत, त्यांना अत्यंत कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. एचआयव्ही हा एक मोठा आजार आहे. अनैतिक शारीरिक संबंध तसेच अन्य काही कारणांमुळे हा आजार फैलावतो. काही वर्षांपूर्वी एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूच प्रमाण लक्षात घेता सरकारकडून मोठ्या प्रमाणात जागरुकतेसाठी उपायोजना करण्यात आल्या.
रेल्वे स्टेशन्स, बस स्टॉप, एसटी स्टँड अशा ठिकाणी जाहीरातींद्वारे HIV या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली. या आजाराची लागण होऊ नये, म्हणून लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे एचआयव्हीचा फैलाव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता सोलापूरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापुरात एका आयसीटीसी सेंटरन खोटा HIV रिपोर्ट दिला. त्यामुळे एका महिलेचा संसार उद्धवस्त झाला आहे. महिला एचआयव्ही पॉजिटीव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट दिला.
सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं
संबंधित आयसीटीसी सेंटरने सरकारी अनुदान मिळवण्यासाठी फेक एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. संबंधित महिला सात महिन्याची गर्भवती असताना एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला होता. मात्र तिचे पती आणि पोटातील मुलाचा रिपोर्ट पाच वेळा निगेटिव्ह आला. संबंधित महिलेने इतर ठिकाणच्या खाजगी सेंटरमधून टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं. त्यामुळे पीडित महिला कुटुंबापासून वंचित आहे. जर संबंधित फेक रिपोर्ट देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास 1 मे रोजी मुख्यमंत्री कार्यालय बाहेर आत्मदहन करणार.
महिलेच्या फेक एचआयव्ही पॉझिटीव्ह रिपोर्ट प्रकरणी चौकशी समिती नेमली. त्रिसदस्यीय समिती तपास करुन संबंधितांवर कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांची माहिती. संबंधित महिलेबाबत घडलेला प्रकार धक्कादायक असून याविरोधात संबंधितावर कारवाई करणार.
Leave a Reply