• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Harish Rana : देशात पहिल्यांदाच इच्छामरणास परवानगी, प्रक्रिया कशी पार पाडली जाणार? कायद्यात तरतूद काय?

March 11, 2026 by admin Leave a Comment


Harish Rana : भारतीय नायिक इतिहासात बुधवार म्हणजेच 11 मार्च 2026 हा दिवस वेगळा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 13 वर्षांपासून दुर्धर आजारामुळे पलंगावर खिळून पडलेल्या हरिश राणा या 31 वर्षीय व्यक्तीची लाईफ सस्टेनिंग ट्रिटमेंट काढून घेण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच न्यायालयाने एका प्रकारे हरिश राणा यांच्या मृत्यूला परवानगी दिली आहे. ते गेल्या 13 वर्षांपासून चेतनाहीन अवस्थेत एकाच जागेवर पडून आहेत. न्यायालायने त्यांची लाईफ सपोर्ट सिस्टिम काढून घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता भारतात इच्छा मरणासाठी काय कायदा आहे? त्याची प्रक्रिया कशी पार पडते? याबाबत जाणून घेऊ या…

माझ्या मुलाला मुक्त करा

हरिश राणा हे पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी होते. 2013 साली त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. पीजीवर राहात असताना ते चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघा तामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. परिणामी ते 100 टक्के ‘क्वाड्रीप्लेजिक डिसअॅबिलिटी’ या आजाराने ग्रर्स्त झाले. ते गेल्या 13 वर्षांपासून पर्मनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटममध्ये (ब्रेन डॅमेजची अवस्था) आहेत. म्हणजेच त्यांचे शरीरा चेतनाशून्य आहे. आपल्या मुलाची ही अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी न्यायालयाचे दार ठोठवून माझ्या मुलाला या कठीण आयुष्यातून मुक्तता द्या, अशी मागणी केली. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानंतर वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने हरीश राणा यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्याचा आदेश दिला.

भारतात इच्छामरणाची प्रक्रिया काय? आता नेमका कोणता नियम पाळला जाणार?

भारतात कोणाला इच्छामरण हवे असेल तर प्रसिव्ह युथेनेशिया ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत रुग्णाला विष देऊन थेट मारून टाकले जात नाही. रुग्ण जिवंत राहावा यासाठी ज्या यंत्रणा, मशीन, तंत्रज्ञान आहे, ते सगळे काढून टाकले जाते. म्हणजेच व्हेंटिलेटर, फिडिंग ट्यूब अशी साधने काढून टाकली जातात आणि नंतर रुग्णाचा मृत्यू होऊ दिला जातो.

दरम्यान, आता हरिश राणा यांच्याबाबतीतही याच प्रक्रियेचे पालन केले जाण्याची शक्यता आहे. जगभरात इच्छामरणाचे नियम वेगवेगळे आहेत. भारतात मात्र याबाबतीत कठोर नियमांचे पालन केले जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in