• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन, हार्दिक-कृणालचं काय बिनसलं ?

April 13, 2026 by admin Leave a Comment


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या हा.स्कोअरिंग सामन्यात काल मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (RCB) शी काल झाला. 12 एप्रिलाल मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सामन्यात आरसीबीचा संघ 18 धावांनी जिंकला. टॉस हरल्यावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट गमावून 240 धावा केल्या, मात्र प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 5 विकेट्स गमावून फक्त 222 धावा करता आल्या, ते 18 धावांनी सामना हरले.

मात्र या सामन्यात जे दृश्य दिसलं तो पाहून सर्वच क्रिकेटप्रेमी हैराण झाले. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. या दोन भावांमधील स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नव्हती, पण त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात होता, कालच्या त्यांच्या वागण्यानतंर या चर्चांना आणखी उधाण आलं. कारण बॉलिंग करताना कृणालने त्याच्या लहान भावाला, हार्दिकला बाउन्सर टाकून त्याचं स्वागत केलं. त्यावर हार्दिकने एकही शब्द न बोलता केवळ थंड नजरेने प्रतिसाद दिला. जे दोन भाऊ सहसा मैदानावर मजा-मस्ती आणि विनोद करताना दिसतात, ते काल खूप गंभीर दिसत होते.

विकेटनंतरची आक्रमक शैली

आणि सामन्यातील सर्वात मोठा क्षण तेव्हा होता, जेव्हा आरसीबीच्या जेकब डफीने हार्दिक पांड्याची विकेट घेतली. हार्दिक बाद झाल्यावर, कृणाल पांड्याने मोठ्याने आणि अतिशय आक्रमकपणे जल्लोष केला, ज्यामुळे चाहते नक्कीच आश्चर्यचकित आणि हैराणही झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून, अनेकांनी या संबंध दोन्ही भावांच्या नात्याशी जोडायला सुरुवात केली. दोघांमध्ये काही आलबेल नाही, असं बोललं जात आहे.

 

Fighting between Hardik and Krunal pic.twitter.com/MVEVlNSctP

— Anshul Rathaur (@anshul_rathaur_) April 12, 2026

हँडशेकही नाही

पण हे प्रकरण एवढ्यावरंच थांबलं नाही. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांना भेटलेही नाहीत, ना एकमेकांशी हँडशेक केलं. त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्यात काही बिनसल्याची चर्चा अधिकच सुरू झाली, कारण याआधी मैदानावर त्या दोघांमधील घनिष्ठ संबंध अनेकदा दिसून आले होते. मात्र काल त्यांचं एकमेकांशी थंड वागणं, विकेटनंतरची आक्रमक शैली, ही वेगळीच कहाणी सांगत होती.

 

Krunal Pandya didn’t went to shake hand with hardik Pandya.
Is everything normal between them??#hardikpandya #MIvRCB pic.twitter.com/WhxPKEwcZP

— impact player (@whypratik) April 12, 2026

Bhaivalry was at it’s peak, emotions running high 🔥#MIvRCB | [Mumbai Indians, Rohit, Kohli, Tilak, Rajat Patidar] pic.twitter.com/CTEtAgcNiB

— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2026

खरंतर पंड्या भावंडांमधीस कुरबूरीची चर्चा आधीच सुरू धाली होती. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमधील हार्दिक पांड्याच्या प्रभावी कामगिरीनंतर एकीकडे सर्वजण त्याचे कौतुक करत होते, पण कृणाल पांड्याकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नाही. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरीही जबरदस्त होती, पण कृणाला पांड्याने ना त्याचं अभिनंदन केलं ना हा सामना पाहण्यासाठी मैदानात गेला. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरही दोघांमध्ये दुरावा असल्याचे संकेत मिळत होते. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे दिसणं, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र यावर अद्याप हार्दिक किंवा कृणाल कोणीची काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहत्यांमध्ये हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होर्मुझची नाकेबंदी होताच भारताला सर्वात मोठी खुशखबर; थेट तेहरानमधून… तेलाचं टेन्शनच मिटलं!
  • Palghar Love Jihad | पालघरमध्ये धक्कादायक प्रकार! मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
  • हायवेवरील टॉयलेट खराब आहेत? गप्प बसू नका, तक्रार करा अन् 1000 रुपयांचे गिफ्ट मिळवा
  • फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब होतील; फक्त करा हे काम
  • पाठीच्या कण्यात सतत होतायेत वेदना? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in