• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Government Job : फोरेन्सिक तज्ज्ञ बनायचे आहे ? कोणता कोर्स गरजेचा ? सरकारी नोकरीची संधी…

April 9, 2026 by admin Leave a Comment


फोरेन्सिक तज्ज्ञांची देशांना मोठी गरज आहे. गुन्ह्यांचे बदलते स्वरुप आणि प्रकार पाहाता या क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना फोरेन्सिक सायन्स लॅबना (FSL) मजबूत करण्यासाठी रिक्त पदांना भरण्याचे आणि तीन महिन्यात सर्व प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाने भरतीच्या नियमांचा फेरआढावा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांकडून मिळालेल्या विशेष फोरेन्सिक पदव्यांना मान्यता मिळावी आणि त्यांना ट्रॅडिशनल सायन्स क्वालिफिकेशनहून स्वतंत्र केले जावे अशी सरकारची इच्छा आहे. तसेच रिक्त पदांना तातडीने भरण्यास सांगितले असून त्यात कंत्राटी पदांचाही समावेश आहे.

आजच्या काळात फोरेन्सिक सायन्स वेगाने वाढणारा करियरचा पर्याय बनत आहे. गुन्ह्यांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीच्या वाढत्या वापरामुळे फोरेन्सिक एक्सपर्टची मागणी सतत वाढत आहे. जर तुम्हीही या क्षेत्रात करियर बनवू इच्छीत आहात, तर फोरेन्सिक तज्ज्ञ कसे बनायचे हे जाणणे महत्वाचे ठरणार आहे, की त्यासाठी कोणता कोर्स करणे गरजेचे असते. आणि कोर्स केल्यानंतर कोठ सरकारी नोकरीची संधी असते ?

फोरेन्सिक एक्सपर्ट काय करतात ?

फोरेन्सिक एक्सपर्ट गुन्हा घडल्याच्या ठिकाणावर मिळालेल्या पुराव्यांचा वैज्ञानिक पद्धतीने तपास करतात. त्यात ब्लड सँपल पासून ते फिंगरप्रिंट, डीएनए, शस्रे आणि डॉक्युमेंट्स आदींचे विश्लेषण यांचा समावेश आहे. याचा अहवाल कोर्टात महत्वाचा पुरावा म्हणून सादर केला जातो, ज्यामुले गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यास मदत होते.

कोणता कोर्स करणे गरजेचे ?

फोरेन्सिक एक्सपर्ट बनण्यासाठी १२ वी मध्ये सायन्स ( फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी /मॅथ्स ) असणे गरजेचे असते. यानंतर बीएससी फोरेन्सिक सायन्स, एमएससी फोरेन्सिक सायन्स, बीएससी इन क्रिमिनोलॉजी या संबंधित विषयात ग्रॅज्युएशन करु शकतात. काही युनिव्हर्सिटी डिप्लोमा आणि सर्टिफिकीट्स कोर्स देखील उपलब्ध करतात.ज्या कॉलेजात फोरेन्सिक सायन्सचे शिक्षण होते. त्यात नॅशनल फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, श्री गुरु तेग बहादूर खालसा कॉलेज ( दिल्ली ), ख्राईस्ट युनिव्हर्सिटी ( बंगळुरु ), सेंट झेवियर्स कॉलेज ( मुंबई ) आणि चंदीगड युनिव्हर्सिटी आदींचा समावेश आहे.

कुठे मिळते सरकारी नोकरी ?

फोरेन्सिक सायन्सचा कोर्स केल्यानंतर फोरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (FSL) सरकारी नोकरीची चांगली संधी मिळते. या लॅब्स राज्य आणि केंद्रीय स्तरावर संचालित होतात. येथे सायन्टीफिक ऑफीसर, लॅब असिस्टंट आणि टेक्निकल स्टाफच्या पदांवर भरती होते. याशिवाय पोलिस विभाग, सीबीआय, एनआयए आणि अन्य तपास एजन्सींमध्ये देखील फोरेन्सिक एक्सपर्टची गरज असते. या पदांवर भरतीसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्यूह पास करणे करजेचे असते.

किती मिळते वेतन ?

फोरेन्सिक सायन्स लॅबमध्ये ( FSL ) फोरेन्सिक एक्सपर्टची भरती वेळोवेळी होत असते. बायोलॉजी, केमिस्ट्री, सायबर फोरेन्सिक आणि अन्य फोरेन्सिक सायन्सच्या क्षेत्रात ही भरती होत असते. भरती परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना ज्युनिअर सायन्टिफीक ऑफिसर पदावर सुमारे ६८ हजार रुपये महिना सॅलरी मिळते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in