• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold-Silver Rate : सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त, इराण युद्धाला 25 दिवस, चांदी तर..

March 26, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅसची मोठी टंचाई असून कच्चे तेलही संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारही कोसळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती या युद्धात उतरताना दिसल्या. इराण आणि अमेरिका युद्धाला 25 दिवस झाले आहेत. मात्र, सोने आणि चांदीचे भाव काही वधारताना दिसत नाही तर उलट घसरतच आहेत. सोने आणि चांदीचे भाव कालपेक्षाही उतरले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले आणि तेव्हापासून मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 23,000 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे. सोने आता 54,000 रूपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीची तर वाट लागली असून आता अर्ध्या किंमतीवर चांदी आली.

मंगळवारी ट्रेडिंग दिवशी 1,38,743 रुपयांपर्यंत सोन्याची घसरण झाली. याचा अर्थ असा की, या 25 दिवसांत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 23,361 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सोन्याच्या उच्चांकी दराबद्दल बोलायचे झाले तर, 29 जानेवारी रोजी सोन्याने वेगाने प्रति 10 ग्रॅम 1,96,093 रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. चांदीचीही तिच स्थिती आहे. काल 22 कॅरेटचा भाव 1 लाख 28 हजारांपर्यंत होता. आजही या भागात घसरण होण्याचा अंदाज आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जागतिक बाजारपेठेवर बसत आहे. त्यामध्येच सोने आणि चांदीच्या किमती घसरताना दिसत आहेत. सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने अनेकांनी खरेदी करण्यासही सुरूवात केली. मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत होती. या युद्धाच्या दरम्यान किमती कमी होताना दिसत आहेत.

फक्त सोने आणि चांदीलाच या युद्धाचा फटका बसला असे नाही. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली आणि तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात अस्थिर झाल्या. सतत त्या वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेने जगातील अनेक देशांना सांगितले. युद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in