
बुल्गारिया देशातील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची नेहमीच चर्चा असते. त्यांनी आगामी काळातील भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. सध्या त्यांनी सोने आणि चांदीविषयी केलेल्या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत आहे.
बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीमुळे सामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. त्यांची ही भविष्यवाणी 2026 सालासाठी असून त्यांनी सोने, चांदी, कॉपर यासारख्या धातूंची किंमत भविष्यात चांगलीच वाढणार आहे, असे भाकित केले आहे.
जेव्हा कागदी चलन म्हणजेच रुपया, येन, डॉलर आदी चलनांचे मूल्य कमी होईल तेव्हा लोक सोने, चांदी यासारख्या किमती धातूंना गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानतील आणि त्यावेळी सोने आणि चांदीचा भाव वाढेल, असे भाकित बाबा वेंगाने केले आहे.
वत्तीय अस्थिरतेमुळे सोने आणि चांदी, तांबे यासारख्या मौल्यवान धातूंची किंमत वाढेल, असे बाबा वेंगाना म्हटले आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास सोन्याचा भाव 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच चांदीचा भावही थेट 4.20 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply