
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून सोन्याचा भाव सलग वाढताना दिसत होता. आता मात्र सोन्याला उतरती कळा लागली आहे. सोन्याचा भाव आज (30 डिसेंबर) चांगलाच पडला असून सामान्यांना दिसाला मिळाला आहे.
आता लवकरच 2026 हे साल सुरू होणार आहे. त्याआधी सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय. सोन्याचा भाव आज तब्बल 2,419 रुपयांनी कमी झाला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने चांगलीच आपटी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवारी 136781 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भाव मंगळवारी 134362 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला. म्हणजेच सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्याचा भाव चक्क 2,419 रुपयांनी कमी झाला. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 136233 रुपयांवरून 133824 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तुम्ही सोन्यात गुंतवणूक करत असाल तर तुमच्या शहरातील स्थानिक बाजारात या धातूचा भाव काय आहे ते जाणून घ्या त्यानंतरच गुंतवणुकीचा विचार करा. कारण स्थानिक पातळीवर घडणावळीचे चार्जेस वेगवेगळे असतात.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply