
गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. भू-राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेचे व्यापार धोरण यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याया निवडत आहेत. त्यामुळेच सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी घसरतो आहे. (फोटो सौजन्य- मेटा आय)
सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना पाहायला मिळत होते. परंतु आता पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढला आहे. ही वाढ पाहून भविष्यात सोनं आणखी महागणार का, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा आय)
मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रूपयांची वाढ तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य- मेटा आय)
या भाववाढीमुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 2 लाख 78 हजार 100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. सोन्याचा भाव असाच वाढत राहिला तर तो लवकरच पावणे दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा आय)
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (फोटो सौजन्य- मेटा आय)




Leave a Reply