• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : अर्थसंकल्पानंतर सोन्याचे भाव घसरणार? दागिने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा

January 25, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने प्रतितोळा 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेले आहे. यामुळे सोने खरेदी करणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कारण सध्या सोने आणि चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. आता काही दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात सरकार असा एखादा निर्णय घेईल ज्यामुळे सोन्याचे दर खाली येतील अशी नागरिकांना आशा आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोने आणि चांदीचे दर का वाढत आहेत?

सोने आणि चांदीचे दर का वाढले आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 5 हजार डॉलरपर्यंत पोहोचले आहेत, तर चांदी 100 डॉलच्या जवळ पोहोचली आहे. तज्ञांच्या मते जागतिक तणाव आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. तसेच ग्रीनलँड वाद हा एक प्रमुख घटक आहे, यामुळे पुरवठा साखळीवर आणि बाजारावर परिणाम झाला आहे. यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांनाही त्रास होत आहे.

आयात शुल्क तर्कसंगत करण्याची मागणी

देशातील महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. मंगळसूत्र लिमिटेडच्या शृंगार हाऊसचे एमडी चेतन थडेश्वर यांनी म्हटले की, सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क तर्कसंगत करण्याचा निर्णय घ्यावा. जर कर रचना सुधारली आणि शुल्क कमी केले तर त्याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांना होईल. यामुळे किरकोळ व्यापाराला चालना मिळेल आणि उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आयात शुल्क कमी झाल्यास सोने स्वस्त होऊ शकते.

एसजीबी योजना पुन्हा सुरू होणार?

सोने खरेदी करणे म्हणजे केवळ दागिने खरेदी नसून ही एक गुंतवणूक देखील आहे. त्यामुळे सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड (एसजीबी) योजना पुन्हा सुरू करण्याची होत आहे. मास्टर ट्रस्ट ग्रुपचे संचालक जश्न अरोरा यांच्या मते, कर आणि शुल्कात वारंवार होणारे बदल अचानक किमतीत चढ-उतार होतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसतो, त्यामुळे ही योजना सुरू करावी.

एसजीबी योजनेत सरकारला 2.5% व्याजदर आणि कर लाभ मिळत होते. 2024 मध्ये ती बंद करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा ती सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत जागरूकता मोहिमा आणि कर सवलतींमुळे डिजिटल सोन्याला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे घरांमध्ये साठवलेले सोने आर्थिक कारणांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अर्थसंकल्पात जीएसटी कमी करण्याची मागणी

आपण सोन्याचे दागिने खरेदी करतो तेव्हा सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त मेकिंग चार्जेस आणि जीएसटी भरावा लागतो. सोन्याच्या दागिन्यांवर 3% जीएसटी आकारला जातो. आता ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) ने सरकारला हा दर 1.25% किंवा 1.5% पर्यंत कमी करण्याचे आवाहन केले आहे. अर्थसंकल्पात असा निर्णय झाल्यास सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला
  • एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली
  • ‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले
  • ‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं ब्रेसलेट घालण ठरेल फायदेशीर
  • दररोज केस धुणं योग्य की अयोग्य? कोणता शाम्पू केसांसाठी वापरावा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in