• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ

April 10, 2026 by admin Leave a Comment


सोन्यावर भारतीयांचं विशेष प्रेम आहे. सोने खरेदीत भारतीयांना कोणी रोखू शकत नाही असं म्हटलं जातं. सध्या एकतोळा सोन्याचा भाव लाखाच्या पुढे आहे. सोन्याचे दर कितीही वाढू दे. पण सण, लग्न, समारंभ यासाठी भारतीय विशेष करुन मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. सोन्याच्या खरेदीत भारत आणि चीनचे किरकोळ खरेदीदार नेहमीच पुढे असतात. पण जागतिक स्तरावर आता काही वेगळ्या गोष्टी सुरु आहेत. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीचा सपाटा लावला आहे. या बँका आपल्या देशाचं स्वर्ण भंडार वाढवत आहेत. सोने खरेदीच्या या स्पर्धेत पोलंड आणि उज्बेकिस्तान सारखे देश सर्वात पुढे निघून गेले आहेत. जगभरातल्या सरकारांनी अशी अचानक सोने खरेदी का वाढवलीय? त्यामागे काय कारणं आहेत? हे समजून घेणं आवश्यक आहे.

‘द कोबेसी लेटर’च्या आकड्यांनुसार जगभरातल्या केंद्रीय बँकांकडून सोने खरेदीचा सिलसिला 23 व्या महिन्यातही कायम आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ग्लोबल सेंट्रल बँकांनी 19 टन सोनं खरेदी केली. याआधी जानेवारी महिन्यातही 6 टन सोनं खरेदी झाली होती. यावर्षी आतापर्यंत 25 टन सोनं या बँकांच्या तिजोरीत जमा आहे. या महिन्यात सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का पोलंडने दिला. पोलंडच्या केंद्रीय बँकेने एकट्याने 20 टन सोने खरेदी केली. त्यांच्याकडे आता 570 टन सोनं झालं आहे. त्यांच्याकडे जमा असलेल्या एकूण परकीय चलन साठ्याचं हे 31 टक्के प्रमाण झालं. त्याचप्रमाणे उज्बेकिस्तानच्या केंद्रीय बँकेने 8 टन सोनं खरेदी केलं. उज्बेकिस्तानच्या स्वर्ण भंडारात 407 टन सोनं जमा आहे. त्यांच्या परकीय चलन साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण 88 टक्के आहे. मुंबईत प्रती 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1, 51,470 रुपये आहे.

रशियाला सोन विकावं लागलं

चीन जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यांना देखील आपला सोन्याप्रतीचा मोह आवरता येत नाहीय. चीनने सलग 16 व्या महिन्यात सोनं खरेदी केली. फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1 टन सोनं खरेदी केली. आता चीनचं एकूण स्वर्ण भंडार 2308 टनांचं झालं आहे. काही देश सोनं खरेदी करतायत, तर काहींना आर्थिक दबावामुळे सोनं विकाव सुद्धा लागतय. तुर्की आणि रशियाच्या स्वर्ण भंडारात फेब्रुवारी महिन्यात सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आलीय. रशियाने 6 टन सोनं विकलं. इराण युद्धामुळे आर्थिक दबाव तयार झाला. परकीय चलनाची गरज भागवण्यासाठी तुर्कीला मार्च महिन्यात अंदाजित 120 टनाच्या आसपास सोनं विकावं लागलं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
  • मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं
  • मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..
  • Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in