• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..

April 9, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि जोरदार युद्धाला तोंड फुटलं. गेल्या 40 दिवसांपासून हा संघर्ष सुरू होता, ज्यामुळे जगात अशांतता होती, जागतिक बाजारावर, आर्थिक क्षेत्रावरही याचे परिणाम दिसून येत होते. या युद्धाच्या झळा बसत असलाने सोनं-चांदीचे दरही सातत्याने वरखाली होत होते, गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले दिवस दिसत नव्हते. गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव सतत घसरत होते, मात्र काल अमेरिका-इराणने एकेक पाऊल पुढे टाकत युद्धविरामाची घोषणा केली आणि क्षणात सगळं चित्र पलटलं. अवघ्या काही तासांतच सोन्याचे भाव सर्रकन वर गेले आणि सर्वसामान्यांना मोठा झटका बसला.

सोन्याच्या दरातील ही तेजी आजही कायम असून गुरावर, 9 एप्रिल रोजीची सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसत आहे. जागतिक स्तरावर सोनं वाढलं, त्याचे परिणाम देशांतर्गतही दिसून आले असून भारतात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. 9 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,980 रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,830 रुपये इतका आहे. म्हणजेच मुंबईपेक्षा दिल्लीत 24 कॅरेट सोनं हे 150 रुपयांनी महाग आहे.
आदल्या दिवशी, म्हणजे कालच (बुधवारी) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3200 रुपयांनी, म्हणजेच 2.09 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,56,400 रुपयांवर पोहोचला होता. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम होण्याची शक्यता हे सराफा बाजारातील दरवाढीचे एक प्रमुख कारण आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव सध्या प्रति औंस 4,803.33 डॉलर्स इतका आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

देशातील महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,53,980 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,41,160 रुपये आहे. तर मुंबई आणि कलकतत्ता आहे, 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1,53,830 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1,41,010 रुपये मोजावे लागत आहेत.

तसेच चेनन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ही सर्वाधिक म्हणजेच 1,54,920 रुपये तर 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम, अर्थात 1 तोळा सोन्याची किंमत ही 1,42,010 रुपये आहे. पुणे आणि बंगळूरुमधील या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,53,830 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,41,010 रुपये आहे.

 शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹)
दिल्ली 141160 153980
मुंबई 141010 153830
अहमदाबाद 141060 153880
चेन्नई 142010 154920
कलकत्ता 141010 153830
हैदराबाद 141010 153830
जयपुर 141160 153980
भोपाळ 141060 153880
लखनऊ 141160 153980
चंदीगड 141160 153980

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदी या मौल्यवाने धातूनेही आज मागे वळून पाहिलेलं नाही. चांदीच्या दरातही वाढ होत आहे. 9 एप्रिलच्या सकाळी, चांदीचे दर प्रति किलोग्राम 2,60,100 रुपयांपर्यंत वाढला. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 11,00 रुपयांनी, म्हणजेच सुमारे 5 टक्क्यांनी वाढून, प्रति किलोग्राम 2,51,000 रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 77.33 डॉलर आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशात चांदीच्या दराने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी 167 कोटींच्या पेंटिंगने चर्चा, पुनावाला यांच्या सुनेकडे आहे तब्बल 126 कोटींची गुलाबी हिऱ्याची अंगठी
  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in