• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?

April 10, 2026 by admin Leave a Comment


शुक्रवारची सकाळ गुंतवणूकदारांसाठी फारशी चांगली बातमी घेऊन आली नसली तर सोनं-चांदीची खरेदी करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी आजची सकाळ नक्कीच खास आहे, त्याचं कारण म्हणजे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.
10 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,620 रुपये होता. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 51,470 रुपये आहे. म्हणजेच मुंबईपेक्षा दिल्लीत 24 कॅरेट सोनं हे 150 रुपयांनी महाग आहे. आदल्या दिवशी, म्हणजे कालचदिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1500 रुपयांनी, म्हणजेच सुमारे एक टक्क्याने घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 54,900 रुपयांवर आला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कितपत टिकेल, या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफा कमावला, ज्यामुळे सराफा दरात घसरण झाली.

पश्चिम आशियातील लढाया, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडेल की नाही याबाबत असलेली अनिश्चितता, तसेच टँकर वाहतुकीत येणारा व्यत्यय आणि कथित शस्त्रसंधी उल्लंघनाचे वृत्त यामुळे बाजारातील वातावरणावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस व 4,789.67 डॉल आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आज भारतात सोन्याचे भाव घसरलेले दिसले.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,620 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,38,990 रुपये इतका आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि कलकत्ता मध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 51 हजार 470 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 38हजार 840 रुपये मोजावे लागणार आहेत.

देशात सर्वात जास्त दर दिसत आहेत ते चेन्नईमध्ये कारण तिथे 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 52 हजार 720 रुपये आणि 22 कॅरेटचा दर हा 1 लाख 39 हजार 990 रुपये आहे. तर पुणे आणि बंगळूरु या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,51,470 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,38,840 रुपये इतकी आहे.

चांदीचे दर किती ?

सोन्याप्रमाणेच चांदी या मौल्यवान धातूचे दरही आज खाली घसरल्याचे दिसून आले. 10 एप्रिलच्या सकाळी चांदीचे भाव खाली घरून 1 किलोसाठी किंमत 2 लाख 54 हजार 900 रुपये झाले होते. अवघ्या एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव तब्बल 7800 रुपयांनी, म्हणजेच 3.10 टक्क्यांनी घसरून 2,43,200 रुपये प्रति किलोग्राम झाला होता, नंतर त्यात थोडीफार वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 76.24 डॉलर प्रति औंस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीचा दर 4 लाख रुपयांपार गेला होता



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in