• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारत चीनला कर्ज देतो का? चीनवर किती कर्ज?

January 8, 2026 by admin Leave a Comment


चीनच्या अर्थव्यवस्थेचा समावेश हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. मात्र आता हळुहळु चीनची खरी अर्थिक परिस्थिती जगासमोर येत आहे. चीन हा बाहेरून जरी शक्तिशाली आणि मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश दिसत असला तरी मात्र आतून परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये, चीन सध्या प्रचंड आर्थिक दबाव आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. एकीकडे आम्ही जगातील एक मोठी आर्थव्यवस्था आहोत, असं चीन जगाला दाखवत आहे, मात्र दुसरीकडे चीनवर वाढत असलेलं कर्जाचं ओझं हे चीनच्या अर्थव्यवस्थेला तडा देण्याचं काम करत आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की भारत चीनला कर्ज देतो का? आणि दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुलनात्मकरित्या काय फरक आहे? मग चला तर आपण यातील फरक समजून घेऊयात.

चीनमध्ये निर्माण होणारं गरजेपेक्षा जास्त उत्पन्न हाच आता तेथील अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या बाजारपेठांमध्ये सामान तर खूप आहे, मात्र त्याला ग्राहक मिळत नसल्यानं सातत्यानं सामानांच्या किंमती कमी करण्याची वेळ तेथील सरकारवर आली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार चीनमध्ये वस्तूंचा पुरवठा वाढला आहे, मात्र मागणी कमी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत असंतुलन दिसून येत आहे. दुसरीकडे चीनवर कर्ज देखील झपाट्यानं वाढत आहे. स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंजच्या एका रिपोर्टनुसार चीनच्या सरकारवर देशांतर्गत कर्ज 18.8 ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. तर इतर देशांनी दिलेल्या कर्जाचा आकडा हा 2.4 ट्रिलियन डॉलर आसपास आहे. एवढं प्रचंड कर्ज सध्या चीनवर आहे.

भारत चीनला कर्ज देतो का?

भारत चीनला कर्ज देत नाही, कारण विकसनशील आणि अविकसीत देशांना अर्थसाह्य करण्याची भारताची पॉलिसी आहे, त्यामुळे भारत चीनला कर्ज देत नाही, या उलट भारतच वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतो. दुसरीकडे भारत नेपाळ, बांग्लादेश, भूतान सारख्या देशांना आर्थिक मदत करतो, इतरही काही देशांना भारत आर्थिक मदत करतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs PAK : पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार, ट्रॉफी चोर नक्वीची नवी चाल
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं
  • राम चरणच्या आधी बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकर झालेत जुळ्या मुलांचे पालक, शेवटचं नाव चर्चेत
  • Budget 2026: शिक्षणाची गाडी सुस्साट… तीन आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट, 5 विद्यापीठांची घोषणा; एज्युकेशनसाठी आणखी काय?
  • फेब्रुवारीत का येतो प्रेमाला बहर? जगभरात या महिन्याची क्रेझ का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in