
आजकाल तुम्ही मोठ्या शहरांत एक नजर फिरवली तरी 50-50 मजल्यांच्या मोठ्या इमारती दिसतील. महाराष्ट्रात पुणे, मुंबई यासारख्या बड्या शहरांत अशा इमारतींचा प्रमाण खूप आहे. भारतात कोलकाता, बंगळुरू शहरातही अशा इमारती आहेत.
परंतु भारतात सर्वाधिक उंच इमारत कोणत्या शहरात आहे? तसेच भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? याबाबत अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? ते जाणून घेऊ या…
भारतातील सर्वात उचंच इमारत ही महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. विशेष म्हणजे देशातील 70 ते 80 टक्के उंच इमारती या एकट्या मुंबई शहरात आहेत. भारतातील सर्वात उंच इमारत ही मुंबईतील वरळी भागात आहे.
या इमारतीचे नाव पलाईस रोयाल (Palais Royale) असे आहे. ही इमारत एकूण 320 मीटर म्हणजेच साधारण 1050 फूट उंच आहे. ही एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीत 153 मोठे आणि आलिशािन फ्लॅट आहेत. या इमारतींमधून विस्तीर्ण असा अरबी समुद्र दिसतो.
या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. सामान्यांना न परवडणारी या घरांची किंमत आहे. मुंबईत अशा अनेक आलिशान इमारती आहेत. काही काही इमारतींची रचना तर खूपच विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.




Leave a Reply