
ध्रुवतारा : प्राचीन काळापासून खलाशी आणि प्रवाशांसाठी ध्रुवतारा हा दिशा शोधण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. तो नेहमी उत्तर दिशेला स्थिर असतो, म्हणून नकाशात उत्तराला प्राधान्य देणे सोयीचे झाले.
होकायंत्राचा शोध : होकायंत्राचा शोध लागल्यानंतर त्याची सुई नेहमी चुंबकीय उत्तर दिशा दर्शवते. नकाशा वाचताना होकायंत्राची दिशा आणि नकाशाची दिशा जुळावी म्हणून उत्तर वरच्या बाजूला ठेवली गेली.
युरोपियन देशांच्या राजकारण : नकाशाशास्त्राचा आधुनिक विकास प्रामुख्याने युरोपियन देशांनी केला. युरोप उत्तर गोलार्धात असल्यामुळे, त्यांनी सोयीसाठी आणि स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उत्तर दिशा वर ठेवली.
'मर्केटर' प्रोजेक्शन : 1569 मध्ये जेरार्डस मर्केटरने एक नकाशा बनवला जो सागरी प्रवासासाठी क्रांतीकारी ठरला. या नकाशात उत्तर दिशा वर होती, ज्यामुळे जहाजांना दिशा ठरवणे सोपे झाले. आजचे 'गुगल मॅप्स' देखील याच तत्त्वावर आधारित आहेत.
जागतिक मान्यता : जगभरातील विविध देशांमधील नकाशांमध्ये सुसूत्रता असावी यासाठी एक मानक ठरवणे गरजेचे होते. आंतरराष्ट्रीय करार आणि शैक्षणिक सोयीसाठी उत्तर दिशा वर ठेवण्याचे सर्वमान्य झालेले आहे.




Leave a Reply