• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…

February 2, 2026 by admin Leave a Comment


तुरुंग म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. तुरुंगात कैद्यांवर खूप अन्याय केला जातो. त्यांना मारहाण केली जाते, असे अनेकांना वाटते. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक चित्रपटांत अशाच प्रकारची दृश्य दाखवलेली असल्याने सामान्य माणूस तुरुंगाला घाबरतो. परंतु या जगात एक अजब तुरुंग आहे. या तुरुंगात आरोपी, गुन्हेगार नव्हे तर स्थुल आणि जाड लोकांना ठेवले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

वाचायला विचित्र वाटत असेल, परंतु हे सत्य आहे. चीनमध्ये एक अनोखी जागा आहे. येथे लठ्ठ व्यक्तींना त्यांचे वजन कमी करण्यासाठी ठेवले जाते. या तुरुंगाला लोक फॅट जेल म्हणजेच लठ्ठ व्यक्तींचा तुरुंग असे म्हणातात. वजन कमी व्हावे म्हणून येथे लठ्ठ व्यक्तींना ठेवले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या फॅट जेलमध्ये लोकांना 28 दिवस ठेवले जाते. या 28 दिवसांत लोकांना कठोर नियमांचे पालन करावे लागते. नियमांचे पालन करून त्यांना वजन कमी करण्यास मदत केली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या फॅट जेलमध्ये राहण्यासाठी लोक पैसे मोजतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

चीमध्ये फॅट जेल म्हणून ओळख असलेल्या वेट लॉस कॅम्पला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या कॅम्पमध्ये नियम खूपच कठोर असतात. तुमच्याकडून खूप व्यायाम करून घेतला जातो. तसेच संतुलित आणि योग्य आहार खाण्याचा नियम पाळावा लागतो. एका 28 वर्षीय महिलेने इन्स्टाग्रामवर @eggeats या खात्यावर तिचा अनुभव शेअर केला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या महिलेला फॅट जेलमध्ये राहण्यासाठी 28 दिवसांसाठी 1000 डॉलर्स म्हणजेच साधारण 89 हजार रुपये मोजावे लागले. या फॅट कॅम्पमध्ये रोज चार तास व्यायाम करून घेतला जातो. तसेच या तुरुंगात तीन वेळा जेवण मिळते. सोशल मीडियावर काही लोक या फॅट जेलची प्रशंसा करत आहेत. तर लोकांनी या फॅट जेलच्या नियमांवर टीका केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 2nd February 2026 : आज रहा सावध, प्रलोभनांना बळी पडू नका, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
  • अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण… खामेनींचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा, ट्रम्प यांची झोप उडाली
  • एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?
  • GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in