• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : अचानक सूर्य गायब झाला तर? पृथ्वीवर क्षणात विध्वंस; वाचा काय संकट येईल!

January 26, 2026 by admin Leave a Comment


आपल्या सूर्यमालेत सूर्य हा सर्व प्रमुख ग्रहांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल-गोल फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे. परंतु सूर्याची किरणे पृथ्वीवर न आल्यास नेमके काय घडू शकते, ते जाणून घेऊ या…

सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर न आल्यास किंवा सूर्य गायब झाल्यास आपल्याला ड जीवनसत्त्वाची कमतरता भासेल. इतरही काही आजार व्हायला सुरुवात होईल.

सूर्याच्या किरणांच्या मदतीनेच झाडे आपले अन्न तयार करतात. सूर्याची किरणेच नसतील तर वृक्षांचे अस्तित्त्वच संकटात येईल. परिणामी हळूहळू झाडे नष्ट व्हायला लागतील. त्यानंतर झाडेच नसल्यामुळे प्राण्यांचेही अस्तित्त्व धोक्यात येईल. हळूहळू मानवजातदेखील पृथ्वीवरून संपून जाईल.

विशेष म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात म्हणून पृथ्वी सुस्थितीत आहे. सूर्यच गायब झाला तर पृथ्वीचे तापमान हळूहळू घटू लागेल. समुद्रातील पाण्याचा बर्फ होईल. सर्व वस्तू गारठून जातील. परिणामी थंडीमुळे जीवसृष्टीच नष्ट होऊन जाईल.

अर्थात सूर्य गायब झाला किंवा सूर्यकिरणे पृथ्वीवर न आल्यास पृथ्वीचा ऱ्हास होईल, हे सार्वकालीक सत्य आहे. परंतू पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्यास शेकडो, करोडो वर्ष लागतील. म्हणूनच सूर्याचे अस्तित्त्व पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
  • पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या
  • हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
  • अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
  • Sangli Car Accident | मद्यधुंद इनोव्हा चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in