• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gautam Gambhir: गौतम गंभीर हसत का नाही? त्याने स्वत:च सांगितलं त्या मागचं कारण

March 11, 2026 by admin Leave a Comment

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल की नाही याबाबत शंका होती. काही माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता गौतम गंभीरने आपल्या क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे जेतेपद मिळवलं आहे. यानंतर त्याच्या प्रशिक्षकपदावर स्तुतीसुमनं उधळली जात आहे. या दोन मोठ्या यशानंतर गौतम गंभीरने मीडियाशी चर्चा केला. यावेळी त्याला हसत का नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने तसंच उत्तर दिलं. एका मुलाखतीत गौतम गंभीरने सांगितलं की, मला हसायचं असतं. पण प्रशिक्षक म्हणून आपल्यावर इतका दबाव असतो की ठरवलं तरी करू शकत नाहीत.

गौतम गंभीरने सांगितलं की, ‘जेव्ही तुम्ही डगआऊटमध्ये असता तेव्हा काही ना काही पणाला लागलेलं असतं. इतका दबाव असतो की तुम्हाला हसायचं असेल तरी तुम्ही हसू येत नाही. शेवटी असं असेल तर कोण हसेल. दुर्दैवाने, भारतात हरणे हा पर्याय नाही. तुम्ही नेहमीच जिंकू शकत नाही. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्या गोष्टीत गुंतवता, पण तुम्हाला परतावा मिळेल याची हमी नाही. हा शेअर बाजार नाही जिथे तुम्ही गुंतवणूक करता आणि तुम्हाला परतावा मिळेल. आम्ही दीड वर्ष कठोर परिश्रम केले आणि जर आम्ही उपांत्य फेरीत हरलो असतो तर निकाल शून्य असता. खेळ इतर व्यवसायांपेक्षा खूप वेगळा आहे.’

गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारताने दोन आयसीसी आणि एक आशिया कपही जिंकलेला आहे. आता पुढचं लक्ष्य हे 2027 वनडे वर्ल्डकप असणार आहे. कारण या स्पर्धेनंतर गौतम गंभीरचं प्रशिक्षणाचा कालावधी संपणार आहे. एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीर, कर्णधार शुबमन गिल आणि निवडकर्त्यांसह आयपीएलनंतर वनडे वर्ल्डकप 2027 जिंकण्यासाठी ब्लूप्रिंट तयार करणार आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत होणार आहे. त्या दृष्टीने टीम इंडियाला बांधणी करावी लागणार आहे. गौतमगंभीर म्हणाला की, एक सुपर टीम बनवायची आहे. कोणा एका खेळाडू सुपरस्टार बनवून चालणार नाही. त्यामुळेच त्याने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतकर कोणत्याही वैयक्तिक खेळाडूला श्रेय दिलं नाही

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in