• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : 5 असे उपाय जे तुमचं नशीबच बदलून टाकतील, घरात या वस्तू आजच घेऊन या

March 6, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र काम करते त्याचप्रमाणे फेंग शुई देखील काम करते. फेंग शुई हे जरी चीनी वास्तुशास्त्र असलं तरी देखील ते अलिकडच्या काळात भारतामध्ये देखील लोकप्रिय होत आहे. अनेक जण फेंग शुईमध्ये सांगण्यात आलेले उपाय करताना दिसून येतात. प्रत्येक माणसाची इच्छा असते, की आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत. घरात शांतता राहावी, सुख समृद्धी यावी. हातामध्ये पुरेसा पैसा असावा, तसेच घरातील प्रत्येक वक्तीचं आरोग्य हे उत्तम राहावं. यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुईमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तुम्ही जर हे उपाय केले तर ते तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा नियंत्रणाचं काम करतात, आणि त्यामुळे घरात ऊर्जेचं संतुलन निर्माण होतं. ज्याचा तुमच्यावर खूपच शुभ प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाहत्या पाण्याचा स्त्रोत – वास्तुशास्त्रानुसार वाहतं पाणी हे धन आणि संपत्तीच्या आगमनाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घराच्या बाहेर वाहत्या पाण्याचा एखादा स्त्रोत ठेवण्याचा सल्ला फेंग शुई मध्ये देण्यात आला आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील, तसेच तुमच्यावर जर कर्ज असेल आणि कितीही प्रयत्न केले तरी ते फिटत नसेल तर या उपायामुळे तुमच्यावरील कर्ज देखील फिटू शकते. तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा घरासमोर एखादा फाउंटन ठेवू शकता.

घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता – फेंग शुई आणि वास्तुशास्त्र अशा दोन्ही शास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, याच दरवाजामधून सकारात्मक किंवा नकरात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा. त्यामुळे या दरवाजाची नियमित स्वच्छता करावी असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या वेळी न चुकता घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा.

मनी फ्रॉग – फेंग शुईमध्ये मनी फ्रॉगला खूप महत्त्व आहे. मनी फ्रॉग हा आपल्या तोंडातून पैशांचा पाऊस पाडतो, असं फेंग शुईमध्ये माण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या घरात मनी फ्रॉगची मूर्ती असते, त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

संत्र्यांनी भरलेलं भांड – फेंग शुईमध्ये संत्रीला अतिशय शुभ माण्यात आलं आहे, ज्या घरात संत्र्यांनी भरलेलं भांड असतं, त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

लाफिंग बुद्धा – फेंग शुईमध्ये घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे, त्यामुळे घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?
  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in