• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : घरात ठेवा फक्त या चार वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

February 9, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईमध्ये देखील तुमच्या घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू ठेवणं शुभ, कोणत्या वस्तू ठेवणं अशुभ? वस्तुंची दिशा कोणती असावी? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. फेंग शुई शास्त्र देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी या दोन गोष्टींवर काम करते. फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, त्या जर तुमच्या घरात असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं. आरोग्याच्या समस्या निर्माण होणं. काहीही कारण नसताना वाद होणं, अशा घटना घडू लागतात. तर या उलट जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. फेंग शुई शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते, तसेच तुमची भरभराट होते. या गोष्टी तुम्ही विकत घेण्याऐवजी कोणी जर गिफ्ट दिल्या असतील तर त्याचा प्रभाव आणखी वाढतो असं देखील फेंग शुईमध्ये म्हटलं आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

लाफिंग बुद्धा – फेंग शुईनुसार घरामध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती असेल तर तुमच्या घरातील वातावरण कायम आनंदी राहातं. सर्व दु:ख दूर होतात, आणि तुमची सर्व प्रकारच्या संकटातून सुटका होते. घरात कधीही समस्या निर्माण होत नाही, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

लकी बाम्बू ट्री – फेंग शुईमध्ये लकी बाम्बू ट्रीला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये देखील लकी बाम्बू ट्री घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाम्बूला पैसा, संपत्ती आणि धन, तसेच सुखाच्या वाढीचं प्रतिक माण्यात आलं आहे. जसी जसी या बाम्बूची वाढ होते, तसा तसा तुमच्या आयुष्यात पैसा, धन, संपत्ती आणि आनंद देखील वाढतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

मनी ट्री – फेंग शुईमध्ये मनी ट्रीला देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ज्या घरात मनी ट्री आहे, त्या घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतात असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

थ्री लेग्ड टॉड – थ्री लेग्ड टॉड अर्थात तीन पायाच्या बेडूक याला देखील फेंग शुईमध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. थ्री लेग्ड टॉडची मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरामध्ये कोणते House Plant ठेवल्यामुळे सुख समृद्धी नांदते?
  • मोठी बातमी! ZP निवडणुकींचा निकाल लागताच CM फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, घडामोडींना वेग
  • SGB गुंतवणूकदारांनी जिंकली लॉटरी, 5 वर्षांत 216 टक्के परतावा
  • विशाल निकम – अक्षया हिंदळकर यांचा साखरपुडा; अभिनेता म्हणाला ‘देव खरंच माझ्या बाजूने..’
  • Chanakya Niti : जर शत्रू घरातीलच असेल तर त्याचा पराभव कसा करायचा? चाणक्य म्हणतात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in